अपघातग्रस्त अथर्व भिसे यांना “अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान” कडून १०,०००/- रुपयांची वैद्यकीय मदत

0
17

अपघातग्रस्त अथर्व भिसे यांना “अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान” कडून १०,०००/- रुपयांची वैद्यकीय मदत

बारामती तालुक्यातील निरावागज येथील रहिवासी अशोक नरहरी भिसे यांचा १४ वर्षीय मुलगा अथर्व याचा शाळेत जात असताना अपघात झाला. त्यामुळे त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज होती. या कठीण परिस्थितीत अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान बारामती या संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वासराव नारायणराव देवकाते पाटील (उर्फ नाना पाटील) यांनी पुढाकार घेत अथर्वच्या उपचारांसाठी १०,०००/- रुपये (दहा हजार रुपये) देण्याचा निर्णय घेतला.

आज बुधवार, ८ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यादेवी मुलांचे वसतिगृह, सूर्यनगरी, बारामती येथे मदतीचा धनादेश अथर्वचे वडील अशोक भिसे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वासराव देवकाते पाटील, धायगुडे सर, ज्ञानदेव बुरूंगले सर, दत्तोपंत डोंबाळे, सुनिल देवकाते, आबा चव्हाण, अलिभाई पठाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय विश्वासराव देवकाते पाटील यांनी सांगितले की, “अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान नेहमीच गरजू आणि संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी तत्पर असते. अथर्व लवकर बरा व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”

या उदार मदतीमुळे अथर्वच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून गावकऱ्यांनी प्रतिष्ठानचे आणि देवकाते पाटील यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here