अजित पवारांची सांगता सभा: बारामतीच्या विकासासाठी जनतेचा पाठिंबा अपेक्षित

0
22

अजित पवारांची सांगता सभा: बारामतीच्या विकासासाठी जनतेचा पाठिंबा अपेक्षित

आज, दिनांक 18 नोव्हेंबर 2024, अजित पवार यांनी बारामतीतील मिशन हायस्कूलच्या मैदानावर भव्य सांगता सभेत त्यांनी म्हटले की.. मला ऐकायला मिळाले की … लोक म्हणतात आमचं ठरलंय लोकसभेला सुप्रिया सुळे व विधानसभेला अजित पवार असे म्हणतात ते खरे करून दाखवा… बारामतीच्या विकासात्मक कामांचा आढावा घेत, जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. पवार यांनी आपल्या भाषणात बारामतीच्या विकासात अडथळा ठरलेल्या काही मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

विकासावर प्राधान्य

अजित पवार यांनी भाषणादरम्यान सांगितले की, “बारामतीच्या जनतेने नेहमीच विकासाच्या मागे उभे राहून माझ्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला आहे. बारामतीकर मतदार पुनः मला साथ देतील, याची मला पूर्ण खात्री आहे.” त्यांनी बारामतीतील शंकराच्या मंदिराच्या संदर्भातील उल्लेख केला आणि स्पष्ट केले की, “मंदिर रस्त्याच्या विकासासाठी हलवावे लागले, परंतु मी ते शिवशंकराचे मंदिर पुन्हा बांधणार आहे. मी नास्तिक नाही मी अस्तिकच आहे.माझ्या मनातही हा विषय खटकतो.”असेही ते म्हणाले.

महापुरुषांचे स्मारके

पवार यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि लालबहादूर शास्त्री यांचे पुतळे बसवल्याचे सांगून, देशातील इतर महान विचारवंतांचे स्मारक एका ठिकाणी उभारण्याचा संकल्पही व्यक्त केला.

रोजगार आणि विकास योजना

अजित पवार यांनी रोजगारनिर्मितीबाबत मोठी घोषणा केली. “पीडीसी बँकेत 10,000 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. विविध जाती-धर्मातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे,” असे ते म्हणाले.

जातीपातीविरहित राजकारण

पवार यांनी स्पष्ट केले की, “1991 पासून मी विकासात्मक कामे करत राजकारण केले. जातीपातीचे राजकारण बारामतीत कधीच केले नाही.” त्यांनी आठव्या वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा आत्मविश्वास व्यक्त करत जनतेला भावनिक होण्यापेक्षा विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.

कौटुंबिक सहभागाचे कौतुक

सभेत अजित पवार यांनी आपल्या मुलगा जय पवार याच्या भाषणाचे कौतुक केले. “जयने या निवडणुकीत पहिल्यांदा भाषण केले, कदाचित त्याने हे रात्रभर पाठ केले असावे,” असे म्हणत त्यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्नीनेही निवडणूक प्रचारात मोलाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्वेता कोकाटे नावाची मुलगी या सभेत हरवल्याची तिच्या आईने आवाज दिला त्यावेळेस याच प्रसंगी अजित दादा पवार यांनी माइक मधून भाषण सुरू असताना स्वतः पुकारले श्वेता कोकाटे जिथे कुठे असेल तिने तुझी आई इथे आहे असे म्हटल्याबरोबर त्या मुलीने मी ते आहे म्हटले व ही अशी कोणाची सभा नाही हे अजित पवाराची सभा आहे अशी कोणाची मुलगी हरणारच नाही .अजित पवारांचा शब्द ऐकल्यावर हास्य पिकला

आईचा शुभेच्छापत्रातून संदेश

अजित पवार यांच्या आईने शुभेच्छा देताना म्हटले की, “अजितवर खूप अन्याय झाला आहे, पण बारामतीकर नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्याला न्याय द्यावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

सभेचा मुख्य संदेश

अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा पाडा आपल्या भाषणातून मांडला आणि मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय ठरली आणि अजित पवार यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवत होता.

सभेचा महत्त्वाचा निष्कर्ष

बारामतीतील विकासकामे, रोजगार निर्मिती, आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान या मुद्द्यांवर भर देत अजित पवार यांनी आपल्या राजकीय भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या विकासाभिमुख धोरणाला मतदारांनी पाठिंबा दिल्यास बारामतीचा विकास आणखी वेगाने होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here