
अजितदादा पवार उपमुख्यमंत्री चषक 2025: भव्य क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे आयोजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री चषक 2025 या भव्य क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन थाटामाटात पार पडले. माळेगाव कारखाण्याचे व्हा. चेअरमन राजाभाऊ ढवाण पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये संघाचे चेअरमन उत्तमराव जगताप, बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे, संचालक विनायक गावडे, दत्तात्रय तावरे, गोरखभाऊ पारसे, होलार समाज संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष महावीरशेठ बनकर, उद्योजक पै. संतोष जाधव, बाळासाहेब चव्हाण पाटील, बापुसाहेब जगदाळे आणि PSI हारूणबाबा शेख यांचा समावेश होता.
उद्घाटन समारंभात सरपंच गणेश काशिद, उपसभापती लक्ष्मण मोरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाचा टॉच दिला गेला. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीनाथ सोनू मोरे व प्रसाद गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी विनोद मामा गाढवे, अजित कांबळे, सागर शिंदे, प्रशिक कांबळे, राजेंद्र गावडे, अध्यक्ष बंडा काशिद, अवधूत मोरे, गणेशदेवा गावडे, सखाराम गावडे, रणजित गावडे, अभिषेक मोकाशी, किशोर कदम, रुषी गावडे, आकाश गावडे, अभिजित झगडे, सोमनाथ वाकळे, महेश काशिद, ज्ञानेश्वर गावडे, विशाल गावडे, दत्तात्रय गावडे, आबा लक्ष्मण गावडे, अवि भैय्या मोरे, अनिकेत भैय्या नाझीरकर, प्रकाश मोरे, किसन गावडे, राजाभाऊ मोरे (मोरेवाडी), शुभम शिंदे आणि मेडद ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
सामन्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून आयोजित या स्पर्धेमुळे तालुक्यातील युवकांमध्ये खेळासाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे. उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व खेळाडूंना प्रोत्साहित केले.
अजितदादा पवार उपमुख्यमंत्री चषक 2025 चे आयोजन उत्तम पद्धतीने केल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेळ आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा दिली आहे.