वारकऱ्यांसाठी रोटरीचा बारामतीमध्ये सेवाभावी उपक्रम
बारामती, दि. १५ : आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांच्या सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बारामती यांच्या तर्फे विद्यमाने पंढरी महादेव मंदिर परिसरात चहा व बिस्किट वाटपाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
वारकऱ्यांची सेवा करताना मनाला एक वेगळेच समाधान लाभते. समाजसेवा हेच रोटरीचे प्रमुख ध्येय असून, रोटरी क्लब ऑफ बारामती विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाच्या सेवेत कायम अग्रेसर राहिला आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना बिस्किटांचे वाटप करून सेवाभाव जपण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला. तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ बारामतीच्या वतीने वारकऱ्यांना गरम चहाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष रो. अतुल गांधी, सचिव रो. हर्षवर्धन पाटील तसेच डायरेक्टर – सर्व्हिस प्रोजेक्ट (नॉन मेडिकल) रो. ॲड. अक्षय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
उपक्रमात बारामती रोटरी क्लबचे डॉ. विशाल मेहता, महावीर शहा वडुजकर , अभिजित बर्गे, मल्लिकार्जुन हिरेमठ, प्रतीक दोशी, अब्बास नासिकवाला, अलीअसगर बारामतीवाला, कौशल सराफ, राहुल बनकर, स्वप्निल मुथा, निखिल मुथा, विजय इंगळे, डॉ. हनुमंतराव पाटील, अरविंद गरगटे, दत्ता बोराडे, प्रफुल्ल गादिया, प्रवीण ताटे, दर्शना गुजर, अंजली गांधी, श्रद्धा महाडिक तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ बारामतीचे खुशी शहा, रणजीत भोसले, श्रेयश गरगडे, यश आबड, निर्मल रायसोनी, सम्यक गेंजे आणि अर्पिता पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वारकऱ्यांना चहा व बिस्किटांचे वाटप केले.
या सेवा उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रोटरी व रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांनी सेवाभावाने कार्य करत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.




