रुई-वंजारवाडी येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेचा जल्लोष – तीन दिवसांचा थाटात उत्सव!
प्रतिनिधी:
रुई- वंजारवाडी येथे भव्य भैरवनाथ यात्रा उत्सव
रुई (ता. बारामती) – रुई- वंजारवाडी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, रुई यांच्या वतीने भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांनी यात्रा उत्सव उत्साहात पार पडणार आहे.
या यात्रेची सुरुवात रविवारी दिनांक २० एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता भैरवनाथ देवाच्या हळदी कार्यक्रमाने होणार आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता काठी, पालखी, मिरवणूक, ढोल-ताशा, नृत्यपथकासह गावातून यात्रा मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलाकार वसंत नांदवळकर व रविंद्र पिंपळे यांचा जल्लोषात कार्यक्रम सादर होणार आहे.
मंगळवारी दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत झपाटाच्या वतीने “ऑर्केस्ट्रा झपाटा” कार्यक्रम सादर होणार असून त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता निकाल कुत्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. परिसरातील नामांकित पैलवान या कुस्त्यांमध्ये सहभाग घेणार आहेत.

या संपूर्ण यात्रेचे नियोजन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. महादेव पांडुरंग चौधर ,खजिनदार श्री पोपटराव साळुंके
उपाध्यक्ष /विश्वस्त आणि कमिटी सदस्य
त्यांच्या कार्यकारी मंडळाने, गावकऱ्यांनी मिळून केले आहे. यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



