“मीही दादांचंच रक्त; बारामतीकरांचा शब्द पडू देणार नाही” — जय पवार यांचा निर्धार

0
20

“मीही दादांचंच रक्त; बारामतीकरांचा शब्द पडू देणार नाही” — जय पवार यांचा निर्धार
बारामती (दि. ४ एप्रिल) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) यांच्या वतीने राष्ट्रवादी भवन, बारामती येथे आज कार्यकर्ता आढावा बैठक मोठ्या गर्दीत पार पडली. या बैठकीत प्रथमच जय पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत गावोगावी बूथ संघटन बळकट करण्याचे आवाहन केले.
बैठकीत बोलताना जय पवार यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी व भावना जाणून घेत आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी अजित पवार यांचे समर्थक, तसेच पक्षाचे विविध संस्थांचे पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य, सरपंच,नेते सभापती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तसेच पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देण्यात आली.
कार्यकर्त्यांनी दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे शक्य नसले, तरी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असेही सांगितले.
यावेळी जय पवार म्हणाले, “मीही अजितदादांचंच रक्त आहे. त्यांनी दिलेला शब्द कधी पडू दिला नाही; त्याचप्रमाणे मीही तुम्हा बारामतीकरांचा शब्द पडू देणार नाही,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीमुळे आगामी दुःखद आगळ्या- वेगळ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here