जे बोलतो ते मी डेफिनेटली करून दाखवतो.. चं… ?राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने एकतर्फी वर्चस्व सिद्ध ….

0
14

माळेगाव साखर कारखाना निवडणूक: अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचा दणदणीत विजय!

पुणे जिल्हा तसेच राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत दणदणीत यश मिळवले आहे. या निवडणुकीत 21 पैकी 20 जागांवर निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, फक्त एक जागा विरोधकांच्या खात्यात गेली आहे.

चेअरमन पदी मीच राहणारअजित दादांनी जे बोलून दाखवले ते करून दाखवले….

अजित पवार स्वतः ‘ब वर्ग गटातून’ निवडून आले असून त्यांनी प्रचंड मताधिक्याने आघाडी घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलच्या विजयाने बारामती सहकारी क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार पॅनल आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार पराभूत झाले असून, चंद्रराव तावरे हे फक्त स्वतः निवडून आले आहेत.

या निवडणुकीत एकूण चार पॅनल रिंगणात होती:

  1. अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल
  2. शरद पवार यांचे बळीराजा सहकार बचाव पॅनल
  3. चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल
  4. अपक्षांचे कष्टकरी शेतकरी समिती पॅनल

या सर्वांवर मात करत निळकंठेश्वर पॅनलने सत्ता स्थापन केली आहे. या निकालामुळे अजित पवार यांचे बारामती व सहकार क्षेत्रातील वर्चस्व अधिक बळकट झाले आहे, तर विरोधकांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here