माळेगाव कारखान्याचे कंपोस्ट खत शेतकऱ्यांसाठी सज्ज; पुढील आठवड्यापासून वितरणाची शक्यता
बारामती : दि. ३ नोव्हेंबर रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कंपोस्ट खत यार्डाला प्रत्यक्ष भेट देऊन तयार झालेल्या कंपोस्ट खताची पाहणी करण्यात आली. कारखान्याचे कंपोस्ट खत पूर्णपणे तयार झाले असून, आगामी आठवड्यापासून हे खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस कारखान्याच्या संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
कारखान्याच्या विद्यमान चेअरमन तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना दर्जेदार कंपोस्ट खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर धोरण निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर हे खत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी कंपोस्ट खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, खताची सद्यस्थिती आणि वितरण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

या पाहणीप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेरमन श्री नितिन शेडे , यांच्यासह एम.डी. जितेंद्र रणवरे, संचालक गणेश भाऊ खलाटे, संचालक रतनदादा भोसले, संचालक सतीश आप्पा फाळके, शेतकी अधिकारी धनंजय लिंबोरे, घोरपडे साहेब, सभासद राजेंद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दर्जेदार कंपोस्ट खत उपलब्ध करून त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी माळेगाव कारखान्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




