बारामतीसाठी तर महाराष्ट्राच्या हिताचाच अजितदादा पवार यांचा तो निर्णय…!
अजितदादा पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस त्यांच्या वाढदिवसपर सर्वप्रथम साप्ताहिक भावनगरीच्या वतीने अजितदादा आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा..!
“अजित” या नावाप्रमाणे अजित दादा त्यांची आजवरची राजकीय नेते म्हणून ओळख निर्माण त्यांनी स्वबळावर प्रस्थापित केलेली आहे.
अर्थातच शरद पवार साहेब यांच्याशिवायही अजित पवार यांची ओळख निर्माण होणे शक्य नाही ,व पुढे ही पावला – पावलावर दादांना साहेबांची राजकारणात कायमची स्मृती राहील .
असेच आजही अजितदादांचा वावर होतो हे सर्व महाराष्ट्र पाहतोय.
अजित पवार यांच्या राजकीय पटलाचा अभ्यास केल्यावर सहाजिकच पटकन लक्षात येईल की शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात तशाच प्रकारची होते. असे दबक्या आवाजात चर्चा ही होते .
परंतु राजकीय पार्श्वभूमी असलेले अजितदादा पवार मात्र भाजपच्या उंबरठ्यावर का गेले तर त्यांची गरज अजितदादाला का वाटली हा जनतेला पडलेला प्रश्न अनुत्तीर्णचं आहे..
का.. एवढा मोठा दादाने वेगळा निर्णय घेतला.तर साहेबांना आता खरी गरज असताना ,घर म्हणून ते चुकले आहेत. मात्र येणाऱ्या काळाचे पावले ओळखत, आणि राजकारणी दूरदृष्टीचा नेता धूर्तपणा कसा साधला पाहिजे काय योग्य अयोग्य हे मात्र दादांना चांगलेच राजकारणात उमजलेले जमलेले दिसून येत आहे.
म्हणून तर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यासारखे प्रगल्भ तेचे, विचारनिष्ठ,हे दक्ष नेते एक विचार घेऊन कदाचित दादा बरोबर असतील. तर तसे राजकीय समीकरण जुळण्याच्याकरिता “हाच्चा” राखून राजकीय खेळी तर साहेबा शिवाय हे जमणार गणित नाहीचं..!
हे ही ह्या वरील मंडळीला माहित आहे. म्हणून पुन्हा विनवणी केली जाते आहे. साहेबांना.. साहेबांना निर्णय पटलेला आहे की नाही का साहेब राजकारण करत आहेत. काहीही असो यात मात्र अजितदादांना काही निर्णय विचारांच्या पलीकडे जाऊन घ्यावे लागलेले दिसून येतात. कारण जेवढे सोपे वाटते तेवढे राजकारण सोपे नाहीचं ..?!
पण ते लोकशाहीत जनतेला, लोकांना, पटवून देणे अवघड असते. शेवटी याचे उत्तर लवकरच राजकीय खेळीच्याच माध्यमातून जनतेसमोर येईल..!
सर्वकाही मग ठीक होईल.. अशी आशा करूयात..!
आत्ताच्या घडीला सोयीचे राजकारण करत.. अजितदादांनी पर्यायी निवड करण्यासाठी सर्वांनाच भाग पाडलेले दिसून येते.
वरील राजकीय खेळीतून मात्र बारामती सह महाराष्ट्रातील जनतेला ही मनातून अजित दादाचा तो निर्णय पटलेला आहेच.. असे अंधुक अंदाज आहे..!?
तर अजितदादांचा तो निर्णय योग्यच त्यावेळी जनताच म्हणेल एवढे मात्र नक्की ….देखेंगे आगे.. आगे होता है क्या ….! आजच्या घडीला ..मात्र आमच्या बारामती सह महाराष्ट्राच्या लाडक्या धडाडीच्या करारी बाणा असलेल्या अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थनियोजन वित्तमंत्री यांना 64 व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो दादा.. आपणास मनपूर्वक सहृदयी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व भावी मुख्यमंत्रीपदासाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो…!