विद्या प्रतिष्ठान बारामती मध्ये “अल्डीयास्पार्क २०२६ चे यशस्वी आयोजन..!

0
25

विद्या प्रतिष्ठान बारामती मध्ये “अल्डीयास्पार्क २०२६ चे यशस्वी आयोजन
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, बारामती मधील कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागामार्फत २७ मार्च २०२६ रोजी “अल्डीयास्पार्क २०२६” या पोस्टर स्पर्धेचे आयोजन “बीएफल लॅब” मध्ये अतिशय उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले. ही स्पर्धा एआय -आधारित समुदाय समस्यांवरील उपाय या विषयावर आधारित होती. या स्पर्धेत द्वितीय वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स या विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणेचे मुख्य मार्गदर्शक श्री. विवेक सावंत हे प्रमुख उपस्थित होते. तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांनीही स्पर्धेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.
स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स व मशीन लर्निंगच्या साहाय्याने वास्तविक जीवनातील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची क्षमता विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक समस्यांवर आधारित अभिनव कल्पना पोस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केल्या
“थिंक एआय. • डिझाइन स्मार्ट • इनोव्हेट फ्युचर” ही या कार्यक्रमाची प्रमुख थीम होती ज्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर करण्यासाठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे नेतृत्व विभागप्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी यांनी केले, तर डॉ. वाय. डी. सिंकर यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून यशस्वी भूमिका बजावली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, संशोधन वृत्ती व तांत्रिक कौशल्यांचा विकास झाला असून, संस्थेच्या “ आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे नवोन्मेष” या ध्येयाला अधिक बळकटी मिळाली. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here