बारामतीत आज कवी अनंत राऊत यांचे व्याख्यान
बारामती : पर्यावरणीय फोरम ऑफ इंडिया (NGO), बारामती यांच्या वतीने आज, शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी बारामतीतील ग. दि. मा. सभागृह, विद्यानगरी येथे प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘प्रतिबिंब’ या उपक्रमांतर्गत ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’ या विषयावर कवी अनंत राऊत यांचे ‘काव्य मैफल’ स्वरूपातील व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला सायंकाळी ७ वाजता सुरुवात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
कविता, साहित्य आणि सामाजिक विषयांची आवड असणाऱ्या रसिकांसाठी ही काव्य मैफल पर्वणी ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.



