बारामतीकरांचा अभिमान: बारामती सहकारी बँकेचा ऐतिहासिक आर्थिक विक्रम
सभासद वर्गाच्या विश्वासास पात्र बँक
प्रतिनिधी: बारामती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ अखेर ३५७७ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय करीत ७१ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. बँकेच्या ढोबळ नफ्यात विक्रमी वाढ झाली असून, सर्व वैधानिक तरतुदी पूर्ण करत ११.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्यात यश आले आहे.
बँकेची आर्थिक स्थिती (३१ मार्च २०२५ अखेर)
एकूण व्यवसाय: ३५७७ कोटी रुपये
ढोबळ नफा: ७१.०० कोटी रुपये
निव्वळ नफा: ११.६३ कोटी रुपये
बँकेच्या भविष्यातील धोरणात्मक उद्दिष्टे
देशातील टॉप १० नागरी सहकारी बँकांमध्ये स्थान मिळवणे.
सभासदांना सर्वोत्तम बँकिंग सेवा पुरवणे.
बँकेचे कार्यक्षेत्र विस्तारित करणे आणि नव्या शाखा सुरू करणे.
डिजिटलायझेशनद्वारे अत्याधुनिक सेवा प्रदान करणे.
जलद व सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करणे.
विविध कर्ज योजना राबवून कर्जवाटपाचा विस्तार करणे.
नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राहकांची सोय करणे.
सभासदांच्या आर्थिक गरजांनुसार विशेष उत्पादने सादर करणे.
अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांची मेहनत – यशाचा गाभा
बँकेच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्यसभा सदस्या सौ. सुनेत्रा पवार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याने बँकेचा विकास आणि प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे, असे अध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.
बँकेच्या या उज्ज्वल यशामागे व्यवस्थापन मंडळाचा ठाम विश्वास व कर्मचाऱ्यांची अविरत मेहनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या बँकेच्या धोरणामुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली. सभासदांचा विश्वास हीच बँकेच्या यशाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
संचालक मंडळ व कर्मचार्यांचे योगदान
बँकेच्या ऐतिहासिक यशाबद्दल अध्यक्ष आणि संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले असून, सर्व ग्राहक, कर्जदार, ठेवीदार आणि भागधारकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या यशामध्ये उपाध्यक्ष विजयराव गालिंदे, तज्ञ संचालक प्रितम पहाडे (सी.ए.), अॅड. शिरीष कुलकर्णी (अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ), संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, देवेंद्र शिर्के, उद्धव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, सौ. नुपूर शहा, डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. अमोल गोजे, अॅड. रमेश गानबोटे, शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक विनोद रावळ तसेच सर्व कर्मचारीवृंद यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
बारामती सहकारी बँकेच्या ऐतिहासिक प्रगतीबद्दल संपूर्ण बारामतीकरांना अभिमान वाटावा असा हा आर्थिक विक्रम आहे!


