बारामती परिसरातील लघुउद्योगांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार…..युगेंद्र श्रीनिवास पवार

0
182

बारामती एमआयडीसी व परिसरात शेकडो लघुउद्योजक कार्यरत असून ठिबक सिंचन सह अनेक प्रकारचे दर्जेदार उत्पादने येथे तयार होत आहेत. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही शरयू उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी उद्योजकांना दिली. बारामती एमआयडीसी परिसरातील ठिबक सिंचन यंत्रसामुग्री उत्पादन करणाऱ्या ग्रीनवर्ल्ड अग्रिटेक या प्रकल्पाला भेट देण्याचा कार्यक्रम बारामती इंडस्ट्रियल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनने आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.

बारामती इंडस्ट्रीयल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख वकील, खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वीय सहाय्यक नितीन सातव, उद्योजक चंद्रकांत नलवडे, हरीश खाडे, केतन भोंगळे, ओंकार सोनवले, सुधीर जाधव, अभिजित शिंदे, नितीन नलवडे आदी उपस्थित होते.

धनंजय जामदार म्हणाले बारामती एमआयडीसी व परिसरात इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, फ़ूड प्रोसेसिंग, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने येथील लघुउद्योजक घेत आहेत. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी युगेंद्र पवार यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

ग्रीनवर्ल्ड अग्रिटेक चे संचालक हरीश खाडे यांनी ठिबक सिंचन प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया दाखवली व ठिबक सिंचनचे उत्पादन करणारे लघुउद्योजक योगिराज काकडे, योगेश राऊत, सुधीर जाधव, ओंकार सोनवले, केतन भोंगळे यांनी ठिबक उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here