पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग, क्रीडा आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध…

0
3

पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग, क्रीडा आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध

जागतिक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी महाराष्ट्र शासनाचे ठाम पाठबळ

पुणे : पुणे दौऱ्यावर आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या (यूसीआय) शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ पुण्यात विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिष्टमंडळातील मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाचे क्रीडा संचालक पीटर व्हॅन डेन अबीले, धोरणात्मक क्रीडा व्यवस्थापक मॅथ्यू नाइट, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पुरस्कार व प्रकल्प समन्वयक गिलॉम रोमेयर यांच्यासह भारतीय सायकलिंग महासंघाचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग आणि महासंचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते.
तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्राचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे भव्य सायकल फेरीचे यशस्वी आयोजन करण्यासोबतच पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या जागतिक रस्ता सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य आणि ठाम पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
पुण्यातील स्पर्धेची उत्तम तयारी, प्रशासनातील प्रभावी समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. पुण्यात सायकलिंगसाठी निर्माण होत असलेल्या अनुकूल वातावरणाची आणि क्रीडा क्षेत्रातील वाढत्या क्षमतेची शिष्टमंडळाने दखल घेतली.
पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग, क्रीडा आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जागतिक स्तरावरील सायकलिंग स्पर्धांचे आयोजन पुण्यात झाल्यास शहराच्या क्रीडा क्षेत्रासोबतच पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Previous articleॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here