पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी प्रताप (आबा) पागळे यांची निवड…
बारामती प्रतिनिधी:
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रताप (आबा) गुलाबराव पागळे यांची निवड…
बारामती पंचक्रोशीतील जळोची गावचे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते तथा बारामती दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन प्रताप (आबा) गुलाबराव पागळे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वा, मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे आचार- विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा मानस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली संधी व त्याच्या माध्यमातून यापूर्वी प्रताप (आबा ) पागळे यांनी विविध पक्ष पदावर कार्यरत राहून सर्व समावेशक विचारधारा बाळगून , सर्वधर्मीय सम विचारधारेच्या जनसामान्य समुदायांमध्ये ते वावरताना कार्यक्रमाला उपस्थित राहून गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभाग होत. त्यांच्या पाठीशी पुणे जिल्ह्यातील तरुण वर्गांचा विश्वास ज्येष्ठांचे आशीर्वाद तर पक्षाचे विचार मनात बाळगून नवनिर्वाचित पुणे जिल्हा उपाध्यक्षपदला या माध्यमातून नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे निवड झाल्याच्या नंतर प्रताप (आबा) पागळे यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने त्यांना निवडीचे तसे पत्र ही त्यांना देण्यात आलेले आहे..