पालखी सोहळ्याला बारामती वकील संघटनेचा सामाजिक सलाम! राजगिरा लाडू, पाण्याचे वाटप करून दिला सेवाभावाचा संदेश!

0
11

पालखी सोहळ्याला बारामती वकील संघटनेचा सामाजिक सलाम! राजगिरा लाडू, पाण्याचे वाटप करून दिला सेवाभावाचा संदेश!

बारामती, दि. २९ जून —
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती वकील संघटनेने एक अद्वितीय सामाजिक उपक्रम हाती घेतला. पाटस रोडवरील मधुबन हॉटेल समोर खास स्टेज उभारून पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी येणाऱ्या प्रत्येक दिंडी प्रमुखांचे सन्मानपूर्वक स्वागत करत वारकऱ्यांना सुमारे २००० राजगिरा लाडू, बिस्किटे आणि थंड पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. या माध्यमातून वकील संघटनेने सेवा आणि संस्कृतीचा संगम साधत एक सकारात्मक सामाजिक संदेश दिला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वकील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे, उपाध्यक्ष ॲड. अनुप चौगुले व ॲड. हर्षदा सस्ते, सचिव ॲड. विजय कांबळे, सहसचिव ॲड. श्वेता वणवे, खजिनदार ॲड. संदीप बनसोडे, ॲड . अमेंद्र महाडिक, ॲड. वाघमोडे ग्रंथपाल ॲड. राम सूर्यवंशी, महिला प्रतिनिधी ॲड. मोनिका कोठावळे/निलाखे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विशेष उल्लेखनीय म्हणजे जेष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, महिला वकील भगिनींचा सहभाग. त्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक स्वरूपात देणग्या दिल्या आणि हिरिरीने वारकऱ्यांची सेवा केली. वकील संघटनेतील प्रत्येक सदस्याने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत एक आदर्श निर्माण केला.

या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे यांनी सर्व सहकाऱ्यांचे, दिंडी प्रमुखांचे व वारकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

वारकऱ्यांचे स्वागत, वकिलांचा उपक्रम — सेवाभावाने भरलेले बारामतीचे पवित्र दर्शन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here