पारधी समाजामध्ये पुन्हा असे आदर्श बाबा होणार नाही ….. श्रीकांतदासजी धुमाळ

0
57

मंहत गुरुजी डॉ श्रीकांतदासजी रामचंद्र धुमाळ महाराज यांनी नायगाव मध्ये आदीवासीचे संतरुपी कै. ज्ञानदेव भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण पारधी समाजामध्ये पुन्हा असे आदर्श बाबा होणार नाही ….. श्रीकांतदासजी धुमाळ


प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी
माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते तसं पुण्याचं नाही ते दिसत नाही पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही इतरांचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची लायकी सिद्ध करणं कधीही चांगलं जर तुम्हाला वाटले मी एकटा काय करू शकतो तर एकदा सूर्याकडे पाहून विचार करा तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो ज्याने स्वतःला ओळखले त्याने जगाला जाणुन घेण्यासाठी वेगळे कष्ट करायची काहीच गरज नसते आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे पारदर्शी राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणस या जगात कधीच एकटी नसतात कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये माणसाला आपल्या कर्तव्याचे ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या आपोआप समजते कितीही मोठा विद्वान असला तरी बालपण त्याला अंकलिपी पासूनच सुरुवात करावी लागते शिवाय मनुष्य जेव्हा एखादा उच्चार तोंडाने करतो त्याचे आधी काही विचार मनात येतो व मग उच्चार होतो आधी विचार मग उच्चार हा सिद्धांत आहे प्रत्येक नामोच्चाराचे वेळी मन जरी दुसरीकडे गेले तरी सूक्ष्म रूपाने भगवंताचा विचार येतो तेव्हाच नामोच्चार होतो भगवंत आणि त्याचे नाम एकमेकाशी चिकटलेले असल्याने नामोच्चार नुसता झाला तरी परमार्थाची वाटचाल थोडी तरी होत असेल याची खात्री बाळगा प्रवास वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरवात करणे म्हणजे आयुष्य राजकारणातील मित्र चित्रपटातील चित्र नाटकातील पात्र हे कधीही खरे नसतात खरे असतात ते फक्त आपले जीवलग व सच्चे मित्र एका कार्यक्रमात एकाने त्या विद्वान वक्त्याला विचारले की समाज पुढे आणण्यासाठी नेमके काय करावे यावर विद्वान वक्त्याने उत्तर दिले पाय ओढण्याऐवजी हात ओढा प्रतिभा परमेश्वराकदडुन मिळते म्हणुन परमेश्वरासमोर नतमस्तक राहू या प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणुन समाजाचे आभारी राहू या परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडुन मिळतो त्यापासुन सावध राहू या माणसाचा मोठेपणा आवश्य असावा पण तो मनाचा असावा माणूसकीचा असावा मात्र दिखाऊपणाचा अजिबात नसावा जीवनाचे दोन नियम आहे बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते सतत नविन शिकण्याची वृत्तीच माणसाला पुढे घेऊन जाते आयुष्यभर विद्यार्थी बनता आलं पाहिजे आयुष्यात संपण्या सारखं काहीच नसतं एक नवीन सुरवात आपली वाट पाहत असते सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे आयुष्यात सावकाश चला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची मनमिळावू स्वभावाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटलीच पाहिजेत श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल आदिवासी पारधी समाजाला मार्गदर्शन करताना बोलत होते श्रीकांतदासजी धुमाळ आणि संपुर्ण पुण्यामध्ये अन्नधान्य वाटप करत असतात गरीब कुटुंबाना आणि शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करतात उपस्थित आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले ग्रीष्म तुकराम भोसले राजश्री ज्ञानदेव भोसले अनिल ज्ञानदेव भोसले सुरेखाताई तुकराम भोसले सुजाता ज्ञानदेव भोसले नायगाव ता हवेली जि पुणे येथे कार्यक्रम झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here