दौंड येथे अनुज्ञप्ती चाचणी शिबीराचे २५ जून रोजी आयोजन

0
15

दौंड येथे अनुज्ञप्ती चाचणी शिबीराचे २५ जून रोजी आयोजन

पुणे, दि.२२: उप प्रादेशिक परिवहन
कार्यालयाचे अनुज्ञप्ती चाचणी शिबीराचे
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड येथे बुधवार, २५ जून २०२५ रोजी आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती प्रादेशिक कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

यापूर्वी बसस्थानक परिसर येथे अनुज्ञप्ती चाचणी शिबीराचे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते, तथापि तांत्रिक अडचणीमुळे यापूर्वीच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे, यापुढे नवीन ठिकाणी शिबाराचे आयोजन करण्यात येईल, या शिबाराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. निकम यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here