तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये ‘बिझनेस फेअर’चे उदघाटन
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीचे ‘इन्क्युबेशन ऍण्ड इनोव्हेशन सेल’ व बिझनेस ऍडमिनिस्ट्रेश् विभागाच्या अंतर्गत बिझनेस फेअरचे उदघाटन शरयू फॉउंडेशन च्या अध्यक्षा मा.सौ. शर्मिलाताई पक यांच्या शुभहस्ते आणि बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष मा. धनंजय जामदार तसेच संस्थेचे अध्यक्ष म जवाहरभाई शाह (वाघोलीकर), सदस्य मा. विकासभाई शहा (लेंगरेकर), मा. चंद्रवदन शहा (मुंबईकर) यांच् उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शर्मिलाताई पवार यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्द अभिनंदन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कलागुणांना वाव देण्यासाठी या बिझने फेअरचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे ४० स्टॉल्स उभारले होते. याम सेंद्रिय शेतीशी निगडीत खते, नैसर्गिक सौन्दर्य प्रसाधने, कृत्रिम बुध्दीमत्ता वापरून तयार केलेले फोटो फ्रेम्स, पर्यटन सेव रिचार्जेबल इलेक्ट्रॉनिक बल्ब्ज असे विविध स्टॉल्स मांडण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक मा. महादेव गायकवाड, मा. अनंत अवचट, मा. विजय झांबरे इ. उपस्थित हो उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे, डॉ. योगिनी मुळे, डॉ. सचिन गाडेकर, अधिष्ठाता डॉ. सीमा नाईक गोसावी, डॉ. निरंजन शह डॉ. विकास काकडे, रजिस्ट्रार अभिनंदन शहा उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. दीपाली अनपट – चव्हाण, प्र महेश फुले, श्री. कृष्णा काळे, प्रा. सेजल अहिवळे, प्रा. वर्षा तावरे, प्रा. सानिका दोशी, प्रा. उज्वला गाडे यां यशस्वीरीत्या केले. स्वागत व सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी केले. महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.