Homeबातम्यालोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व मानवधर्म पतसंस्थेकडून सेवानिवृत्त विनायक कहाळेकर ,कुटुबियांचा सत्कार....!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व मानवधर्म पतसंस्थेकडून सेवानिवृत्त विनायक कहाळेकर ,कुटुबियांचा सत्कार….!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व मानवधर्म पतसंस्थेकडून सेवानिवृत्त विनायक कहाळेकर ,कुटुबियांचा सत्कार....!

सहकार प्रशासकीय सेवेतील एक निवृत्त कुटूंबप्रमुख

श्री विनायक कहाळेकर निरोप समारंभात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गौरवोद्गार..!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व मानवधर्म पतसंस्थेकडून सत्कार

अकोला — सुयोग्य व्यवस्थापन ,कुशल कार्यप्रणाली तील उच्च कोटीच्या निर्णयक्षमतेने प्रश्नांची सोडवणूक करणारे एक प्रेमळ कुटूंबप्रमुख म्हणजे आमचे साहेब होते.ते आमच्यासाठी बॉस नव्हे तर कुटूंबप्रमुख होते.असे गौरवोद्गार सहकार विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक श्री विनायक कहाळेकर यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभात व्यक्त करून सपत्नीक सत्कारासह त्यांच्या कार्यशैलीचा समर्पक शब्दात गौरव केला. याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष व मानवधर्म पतसंस्थेचे माजी अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी सुध्दा त्यांचा दोन्ही संस्थेच्या वतीने सत्कार केला.पतसंस्था व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे यावेळी उपस्थित होते.

        जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय व सहकार व विभागाच्या अकोला जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवापूर्तीपश्चात त्यांचा सत्कार तथा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. हॉटेल सेन्ट्रल प्लाझा येथे वाशिम येथील जिल्हा उपनिबंधक श्री.डी.एस.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक श्री.शंकर कुंभार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी श्री रविन्द्र जोशी सेवानिवृत्त लेखा परिक्षक वर्ग १ ,श्री श्रीकांत देशपांडे,राजेन्द्र खेडेकर ,ईतर लेखापरीक्षक मंडळी,तालूका उपनिबंधक श्री बोराळे, सौ.मलिये मॕडम व अकोला जिल्ह्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी तथा संस्था पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सहाय्यक निबंधक श्री अभयकुमार कटके यांनी आपल्या प्रास्ताविकातून कहाळेकरांच्या उच्च शैक्षणिक पात्रता,प्रशासकीय अनुभव आणि पार पाडलेल्या उल्लेखनिय सेवाकार्याचा आढावा सादर केला.

श्रीमती काळे मॅडम यांच्या

सुत्रसंचालनाखाली झालेल्या या कार्यक्रमात कहाळेकर यांच्या अभिनव कार्यशैलीची माहिती देतांना वक्त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अकोला अकोला जिल्ह्याचे सहकार क्षेत्रातील प्रगतीपर कामकाज अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर असल्याचा उल्लेख केला.त्याचप्रमाणे महिलांचा कामकाजातील सहभाग वाढवून मार्गदर्शन आणि नैतिक पाठबळाने महिला कर्मचारी कामकाजात सक्षम ठरल्याची माहिती यावेळी दिली. अत्यंत भावस्पर्शी ठरलेला हा समारंभ यशस्वी करण्यासाठी सहाय्यक निबंधक श्री.अभयकुमार कटके,श्रीमती भाकरे,कार्यालय अधिक्षक श्री.एस पी फुके, श्री.ए.ए.मनवर, श्रीमती एस.ए.गावंडे, श्री.ए.बी.सिरसाठ, श्री.एस.डी.नरवाडे, कु.आर.डी.पागधुने, श्री बी.एच. पापळकर, कु.आर.आर.मोरे, श्री.व्ही.व्ही.मेश्राम, श्री.नारायण रोकडे,श्री.बानुबाकुडे यांनी परिश्रम घेतले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on