छत्रपती सहकारी साखर कारखान्यात जय भवानी माता पॅनलचा भडका!
अजितदादांच्या आशीर्वादाने बिनविरोधतेचा शंखनाद…
लाखो शेतकऱ्यांच्या आशेचा किरण –श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना – याच्या 2025 ते 2030 या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीला आता चांगलाच राजकीय रंग चढला आहे. दिनांक 18 मे 2025 रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री दत्तात्रय भरणे आणि शेतकरी नेते पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येत सर्वपक्षीय “श्री जय भवानी माता पॅनल” मैदानात उतरवला आहे.
या पॅनलमध्ये कारखान्याच्या विविध विभागांतील 21 जागांसाठी प्रबळ, कार्यक्षम आणि जनाधार असलेले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राजकारण, सहकार आणि समाजकारण यांचा मिलाफ दिसून येतो.
पत्रकार परिषद गाजवली!
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरणदादा गुजर व तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला अफाट गर्दी लोटली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“आपला कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येत बिनविरोध निवडणूक घडवावी, हेच शहाणपणाचं आणि हिताचं पाऊल ठरेल.”
पॅनलचा झंझावात – उमेदवारांची यादी थरारक!
जय भवानी माता पॅनलने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे –
गट क्र. 1 – लासूर्णे
पृथ्वीराज साहेबराव जाचक
जामदार शरद शिवाजी
गट क्र. 2 – संणसर
निंबाळकर रामचंद्र विनायक
निंबाळकर शिवाजी रामराव
गट क्र. 3 – उद्धट
घोलप पृथ्वीराज श्रीनिवास
कदम गणपत सोपान
गट क्र. 4 – अंथूर्णे
शिंगाडे विठ्ठल पांडुरंग
दराडे प्रशांत दासा
नरोटे अजित हरिश्चंद्र
गट क्र. 5 – सोनगाव
अनिल सिताराम काटे
बाळासाहेब बापूराव कोळेकर
संतोष शिवाजी मासाळ
गट क्र. 6 – गुणवडी
कैलास रामचंद्र गावडे
सतीश बापूराव देवकाते
निलेश दत्तात्रय टिळेकर
अन्य राखीव जागा –
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन
पाटील अशोक संभाजीराव
ब वर्ग अनुसूचित/ जाती-जमाती
मंथन बबनराव कांबळे
महिला राखीव प्रतिनिधी
सौ. माधुरी सागर राजपुरे,
सौ. सुचिता सचिन सपकळ
इतर मागास प्रवर्ग
शिंदे तानाजी ज्ञानदेव
भटक्याविमुक्त जाती व जमाती विशेष मागास
डॉ. पाटील योगेश बाबासाहेब
हे उमेदवार श्री जय भवानी माता पॅनल चे अधिकृत असतील.
अजितदादांचा करिष्मा – शेतकरी हितासाठी एकजूट!
ही यादी अजितदादा पवारांच्या गटा तर्फे अधिकृत पणे जाहीर झाली असून, तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकवटलेल्या शक्तीचे दर्शन घडते आहे. राजकारणाच्या पुढे जात, शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सर्व नेते एकत्र आल्याचं हे मोठं उदाहरण ठरत आहे.
साखर कारखान्याची ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि कारखाना नव्या तेजाने उभा राहावा, हीच शेतकरी जनतेची अपेक्षा असून, श्री जय भवानी माता पॅनलने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे ज्येष्ठ नेते किरण दादा गुजर यांनी अजित दादा पवार यांच्या वतीनेअधिकृतपणे ही यादी जाहीर केली.
“एकत्र येऊया – कारखाना वाचवूया राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
