छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा-उत्तम दिघे
बारामती, दि. २८: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे २ ऑगस्ट रोजी शरदचंद्र पवार कॉलेज इंजीनियरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी सोमेश्वर नगर येथे समाधान शिबीराचे आयोजन करावे, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी लाभ देण्याची कार्यवाही करावे, असे निर्देश आवाहन उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिले. या शिबिरात नागरीकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन यादव, तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. दिघे म्हणाले, महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबधित दैनंदिनी प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्यादृष्टीने शिबीर अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र तसेच गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याबाबत सनद वाटप करणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत सातबारा मोहिम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी विशेष तरतुद, कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपारिक व्यवसायासाठी सवलती, शेतजमीनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पुर्णपणे माफ तसेच ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, शिधापत्रिका वाटप करणे.
ते पुढे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, 7/12 अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त पत्रके तयार करणे, ई मोजणी, शेतकरी ओळखपत्र तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, आधारकार्ड दुरुस्ती, भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर, एनसीएमसी कार्ड वाटपाबाबत एसटी महामंडळाच्यावतीने शिबिराचे आयोजन आदींबाबत करण्याबाबत सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करणे बाबत दिशानिर्देश दिलेले आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. दिघे यांनी दिल्या.



