गुणवरे येथील काळ भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू…!

0
201

गुणवरे येथील काळ भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू…!

भैरवनाथाच्या नावानं.. चांगभलं … चांगभलं.. नामघोषाने यात्रा उत्सव.. दुमदुमला..!

गुणवरे प्रतिनिधी: गुणवरे तालुका फलटण गावात आज दिनांक २९ शनिवार रोजी मोठी गर्दी लेझीम..तर रस्त्यात लहानापासून मोठ्यापर्यंत एकाच आवाज चांगभलं.. चांगभलं भैरवनाथाच्या नावानं चांगभलं सालाबाद प्रमाणे याही वर्षी फलटण तालुक्यातील मौजे गुणवरे येथे काळ भैरवनाथाची यात्रा व


काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे यामध्ये बारा बैलगाडी ओढण्याचा मान तर बैलगाड्या ओढताना सर्व पै.पाहुण्यांचे, गावकऱ्यांचे.. लक्ष लागून राहते.. ते.. लहानापासून.. मोठ्या माणसापर्यंत, ज्येष्ठापर्यंत सर्व स्तरातून महिला मुलांच्या -डोळ्याचे पारणे फेडण्याची तो गाड्या ओढतानाचा …क्षण पाहण्याची ..आतुरता त्याप्रसंगी आलेला देवभाव ..श्रद्धा.. एकच जल्लोष.. नाम घोष.. काळभैरवनाथाच्या.. नावानं ..चांगभलं.. जय घोष व सर्व रस्त्यात अलोट हजारोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांचे हात जोडून भक्ती भाव.. हात वर करून चांगभलं.. चांगभलं .. भैरवनाथाच्या … नावानं चांगभलं या..नाम घोषाने.. एकच गलका.. अनेकांनी तो क्षण आपल्या मोबाईलद्वारे,तर उपस्थित प्रत्येकांच्या डोळ्यांचे पापण्यात भरून साठवून.. मन.. कसे भरभरून जाईल असा तो ..एक..क्षण गुणवरे यात्रा उत्सव कमिटीचा तो एक कस लावण्याप्रमाणे आयोजन, नियोजन, संयोजन गर्दीला न जुमानता, “शिस्तबद्ध” यात्रा पार पाडणे कठीण परंतु गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य तर सर्वांना जिव्हारी लावणारी यात्रा.. भैरवनाथ यात्रा उत्सव उत्सवासाठी सर्व स्तरातील सहकार्य ही तितकेच देखणे तर लयबद्ध पद्धतीचे लेझीम चा डाव पाहताना पै. पाहुण्यांच्या गावकऱ्यांच्या मनात काही औरच आनंद मन भरत नाही..असे..हे.. चार दिवस यात्रा उत्सव यामध्ये देवाची हळदी, देवाचे लग्न, मुख्य बारा गाड्या ओढणे ,गुलाल, धडक , तर छबीना.. मनोरंजन पर तमाशा अशा विविध कार्यक्रमाचे मेजवानी अधिकधिक कार्यक्रम पार पाडले जातात.. आणि हो.. सर्व घरोघरी गोडधोड नैवेद्य देवदर्शनाने यात्रा संपन्न होते .तर यामध्ये गुणवरे येथील यात्रा कमिटीचे गावकऱ्यांचे मोठे सहकार्याने आनंदात भैरवनाथचा उत्सव साजरा केला जातो..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here