उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दौऱ्याने बारामती व इंदापूर परिसरात उत्साहाचे वातावरण!
बारामती / इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित पवार यांचा सोमवारी, दिनांक ५ मे २०२५ रोजीचा दौरा उत्साहाने आणि उत्सुकतेने भरलेला असणारं आहे. त्यांचा प्रत्येक थांबावर जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा ठरणारं आहे.
सकाळी ९ वाजता अजितदादांचे मंत्रालय, मुंबई येथे आगमन व राखीव दौऱ्याने सुरुवात त्यानंतर दुपारी १.४५ वाजता ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ …
दुपारी २ वाजता ते बारामतीकडे विमानाने प्रयाण करून २.३० वाजता बारामती विमानतळावर आगमन यानंतर मोटारीने प्रवास करत ते विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.
सायं. ३.३० वाजता त्यांचे श्री मारुती मंदिर, कण्हेरी (ता. बारामती) येथे आगमन होईल आणि तेथे ते मारुती मंदिर दर्शन घेणार आहेत.
यानंतर ४ वाजता इंदापूर तालुक्यातील भवानी माता मंदिर परिसर, भवानीनगर येथे त्यांचे आगमन होईल आणि लगेचच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
अजितदादांच्या या दौऱ्यामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्यात उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण आहे. जनतेमध्ये त्यांच्या भेटीबाबत मोठी उत्सुकता आहे.
