उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत वर्चस्व सिद्ध …!

0
21

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या गटात स्वतः ऐतिहासिक विजय मिळवून एकूण १०१ पैकी तब्बल ९१ मते मिळवत त्यांनी विरोधकांना मोठा धक्का दिला. ‘ब’ वर्गात विजय पटकावत अजित पवार यांनी निवडणुकीत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

मतमोजणीच्या सुरुवातीलाच निकालाचा ट्रेंड स्पष्ट अजित पवार हे 91 मताने विजय झाले आणि माळेगाव साखर कारखाना हा त्यांच्या राजकीय प्रभावाचा पुरावा ठरला. विजयाच्या आनंदात आनंद उत्सव कार्यकर्ते साजरा करत होते.

“या विजयामुळे गटाची एकी आणि सभासदांचा विश्वास सिद्ध झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात अजित पवार यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले असून या निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव आगामी राजकीय घडामोडींवरही पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here