उगाच नव्हे अजितदादा पवार म्हणजे सर्वसामान्यांच्यातील लोकनेता होय…!
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते आज १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून बारामतीतील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित राहून महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करत कार्यक्रमाच्या काही वेळानंतर सहज एक कार्यकर्ता अजितदादा पवार यांच्या जवळ जातो व बोलतो दादा मी रात्री एक झेरॉक्स नवीन मशीन आणलेली आहे आपण त्याचे उद्घाटन करावे अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो व बारामतीकरांचे लाडके
अजितदादा म्हणतात चल कुठे आहे तुझं शॉप, शॉप मध्ये गेल्यानंतर ना कुठला मंडप ना कुठल्या हार तुरे , ना कुठले स्वागताची तयारी, परंतु कार्यकर्ता पोटतिडकिने सांगतो की हार नाही आणू शकलो दादा परिस्थिती हालाकीची आहे त्यामुळे मी काहीही नाही करू शकलो, परंतु माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यांसाठी दादा आपण आलात हे माझे भाग्य उजळले, शब्दात तुमचे ऋण मी व्यक्त करू शकत नाही… तो कार्यकर्ता पुटपूट तो.. परंतु दादा हे स्वभावाने विचाराने दादांना आवडते साधे सुधापणा आज त्याचा परत एकदा प्रत्यय आला तो सर्वसाधारण कार्यकर्ता व त्यांनी सुरू शारदा प्रांगणाच्या बोळीतील ते छोटसं सुहास झेरॉक्स सेंटर , झेरॉक्स मशीन आणि त्या मशीनचे उद्घाटन दादांच्या हस्ते व्हावे ही माफक अपेक्षा ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस त्या कार्यकर्त्याच्या पोटाच्या देठातून पासून ते डोळ्यातून आनंदाश्रू .. सर्व काही ते हे बोली सांगून जाते व म्हणूनच बोलबाला झाला नाही…तर काय एकच वादा अजित दादा यांची प्रचिती पुन्हा पुन्हा बारामतीकरांना व संपूर्ण महाराष्ट्राला येते.
सुहास मढवी या झेरॉक्स दुकानदाराने आमच्या साप्ताहिक भावनगरीशी बोलताना मनोगत व्यक्त केले..!