अत्यंत महत्त्वाचे(संपूर्ण बारामती तालुक्यातील गावागावात धाव घेणारी खबर)बारामती तालुक्याच्या कार्यकर्ते, सरपंच, पदाधिकारी, आणि नागरिक बंधुभगिनींनो!

0
54

बारामती तालुक्याच्या कार्यकर्ते, सरपंच, पदाधिकारी, आणि नागरिक बंधुभगिनींनो!

अत्यंत महत्त्वाचे
(संपूर्ण बारामती तालुक्यातील गावागावात धाव घेणारी खबर)

बारामती तालुक्याच्या कार्यकर्ते, सरपंच, पदाधिकारी, आणि नागरिक बंधुभगिनींनो!

पावसाने या आठवड्यात बारामतीत रौद्ररूप धारण केलं आहे! नीरा आणि कऱ्हा या दोन्ही नद्यांनी पाण्याचा जबरदस्त विसर्ग सुरू केला असून, ओढे, नाले, तलाव अक्षरशः भरुन वाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस बारामतीकरांनी सजग राहणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री. राजवर्धन शिंदे साहेब यांनी केलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचनेनुसार खालील गोष्टी तत्काळ राबवाव्यात:

  1. नदीकाठच्या लोकांशी संपर्क ठेवा!
    प्रत्येक गावातील नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक संकलित करा आणि तातडीने एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करा. दिवसातून दोनदा त्यांच्या परिस्थितीचा आढावा घ्या.
  2. ग्राम सुरक्षा दलाला सज्ज करा!
    त्यांना मानसिकदृष्ट्या तयार ठेवा – आपत्ती आल्यावर ते तात्काळ कृतीस उतरतील.
  3. विजेपासून बचाव!
    शॉर्टसर्किट व विद्युत धक्क्यापासून वाचण्यासाठी लोकांना योग्य सूचना द्या.
  4. चांगले पोहणारे युवक तयार ठेवा!
    गावातील उत्तम पोहणाऱ्यांची यादी तयार ठेवा – गरज पडल्यास ते जीव वाचवू शकतात.
  5. राजकीय-गटतट विसरून मदतीसाठी एकत्र या!
    सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मंडळींनी एकत्र येऊन मदतीच्या कार्याला हातभार लावावा.
  6. झाड पडल्यास…
    तरुणांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी अशा यंत्रसामग्रीसह सज्ज राहावं. झाडं रस्त्यावरून हटवा.
  7. शेतकऱ्यांनो, जनावरे वाचवा!
    पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पाण्याजवळ असलेली जनावरे आणि मोटारी सुरक्षित स्थळी हलवा.
  8. माहिती सतत अपडेट करा!
    ग्रुपवर प्रत्येक हालचाल, मदतीची गरज, किंवा अडचण शेअर करत रहा. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 यावरही संपर्क साधा.

ही आहे काळाची गरज!
वाढता पाऊस, चढता नदीचा पाणीपातळीचा दर – हे संकट मोठं आहे, पण आपल्या एकजुटीच्या बळावर आपण ते नक्की पार करू!
मा. श्री. राजवर्धन शिंदे
अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बारामती

{

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here