अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची मागणी

0
3

अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची मागणी

जय अजितदादा पवार यांनी CID अधिकाऱ्यांची भेट घेत तपासाचा घेतला आढावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी पुण्यात संबंधित CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या भेटीदरम्यान जय पवार यांनी तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही, तपास पूर्ण होण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी आणि प्रलंबित बाबींबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. अपघाताशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

“अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, दादांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय आहे,” अशी भूमिका जय अजितदादा पवार यांनी मांडली.

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तपासातील सर्व बाबींची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे. तपासात कोणतीही दिरंगाई न करता संबंधित बाबींची सखोल पडताळणी करावी आणि दोषींना जबाबदार धरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार विक्रम काकडे उपस्थित होते.

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार, असा ठाम निर्धार जय अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

Previous articleबारामतीत अवैध गावठी दारू निर्मितीवर धडक कारवाई; ७ आरोपी अटकेत, एक फरार
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here