MIT-WPU नॅशनल जलतरण स्पर्धेत श्रीशकुमार शिंदेची चमकदार कामगिरी….!

0
52

MIT-WPU नॅशनल जलतरण स्पर्धेत श्रीशकुमार शिंदेची चमकदार कामगिरी….!

पुणे : दि:४.-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे पार पडलेल्या MIT-WPU 19 व्या नॅशनल पातळीवरील आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत (Summit 2026) चि. श्रीशकुमार संतोष शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत श्रीशकुमारने विविध प्रकारांत सहभाग घेत २ सुवर्ण व २ कांस्य पदके पटकावून संस्थेचा व कुटुंबाचा नावलौकिक वाढवला.
त्याने
50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक (सुवर्ण),
4×50 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात प्रथम क्रमांक (सुवर्ण),
100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात तृतीय क्रमांक (कांस्य)
तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात तृतीय क्रमांक (कांस्य) मिळवला.
नॅशनल पातळीवरील या स्पर्धेत नामवंत महाविद्यालयांतील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अशा स्पर्धेत मिळवलेले यश हे श्रीशकुमारच्या सातत्यपूर्ण सरावाचे व मेहनतीचे फलित असल्याचे क्रीडाप्रेमींमधून कौतुक होत आहे.
त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, प्रशिक्षक व मित्रपरिवाराने अभिनंदन केले असून भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here