चंद्रयान ३ या मोहिमेत आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंद इंडस्ट्रीज महत्वाचा सहभाग..!

0
145

चंद्रयान ३ या मोहिमेत आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंद इंडस्ट्रीज महत्वाचा सहभाग होता हि आपणा सर्वांसाठी अतिशय अतिशय आनंदाची बाब आहे. येथे या मोहिमेसाठी आवश्यक असणारे पार्टस् तयार करण्यात आले.

अनेक अवकाश मोहिमांसाठी वालचंदनगर, ता: इंदापूर येथील वालचंद इंडस्ट्रीजने पार्टस् तयार केले आहेत. गेली पन्नास वर्षांपासून इस्त्रो आणि वालचंदनगर इंडस्ट्रीज एकत्रित काम करीत आहे. इस्त्रोच्या एस एल व्ही ३, ए एस एल ते पी एस एल व्ही, जी एस एल व्ही, मंगलयान आणि चंद्रयान १ व २ या मोहिमांत वालचंदनगर इंडस्ट्रीजने अतिशय मोलाचे सहकार्य दिले आहे.

यापुढेही प्रत्येक मोहिमेत ते सक्रीय योगदान देतील हा विश्वास आहे. वालचंद इंडस्ट्रीजची कामगिरी आपल्या मतदारसंघासठी अभिमानास्पद आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

ISRO #Chandrayaan3 #isroindia #isro

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here