Bsf च्या उद्देशातून स्वप्नपूर्ती उदयास येताना आनंद काही और… चं..! “आर्यनमॅन’ सतीश ननवरे सर

0
360

सुदृढ युवा पिढी घडावी या उदात्त हेतूने , आम्ही सर्वांनी मिळून , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची स्थापना केली.
केवळ छंद किंवा शरीर संपदा असावी म्हणून तरुण मुलांनी व्यायाम न करता , राष्ट्र हितासाठी काय तरी ठोस घडावे हा स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.
आज , एका गोष्टीचे मनापासून आनंद आहे की , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन अर्थात BSF मधून प्रत्यक्ष ‘ जवान ‘ बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे .
आमचे जवळचे मित्र , लक्ष्मण भोसले यांचे सुपुत्र कु.अद्वैत लक्ष्मण भोसले यांची भारतीय सैन्यदलात (इंडियन आर्मी ) भारतातून तिसऱ्या क्रमांकाने (All India 3Rd Rank AIR-3) लेफ्टनंट पदावर क्लास वन ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. स्वप्नपूर्ती उदयास येताना आनंद काही और… चं..!
संपूर्ण भोसले कुटुंब हे आरोग्य , व्यायाम या बाबतीत अंत्यत जागरूक आहेतच , मात्र आपला सुपुत्र देशाच्या सेवेसाठी पाठवावा ही त्यांच्या त्यागाची सर्वोच्च परिसीमा आहे . अर्थात परफेक्ट करिअर अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी अद्वैतला दिलेला पाठिंबा , अद्वैत ची मेहनत आणि गुरुजनांचे आशीर्वाद यांमुळे अद्वैत हे यश मिळवू शकला आहे .
आज लक्ष्मण रावांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद आणि भाव , हा बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि आम्ही सर्व जण मिळून आरंभ केलेल्या कामाची जणू पावती देत आहे .
कु.अद्वैत आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. सुदृढ युवा पिढी घडावी या उदात्त हेतूने , आम्ही सर्वांनी मिळून , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची स्थापना केली.
केवळ छंद किंवा शरीर संपदा असावी म्हणून तरुण मुलांनी व्यायाम न करता , राष्ट्र हितासाठी काय तरी ठोस घडावे हा स्थापनेमागील प्रमुख उद्देश पूर्ती होतानाचा आनंद शब्दात रूपांतरित करता येत नाही ….कु.अद्वैत आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो.
हार्दिक अभिनंदन..!!
जय हिंद 🇮🇳
शुभेच्छुक
आयर्नमॅन सतिश ननवरे
संस्थापक-अध्यक्ष बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here