Ai तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा वाढता ओढा : बारामती कृषी प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद

0
3

AI तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा वाढता ओढा : बारामती कृषी प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद
आज गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे. आज परभणी, अकोला, लातूर, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी मोठी गर्दी केली होती.
प्रदर्शन आठ दिवसांचे असतानाही दररोज शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे. ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्रदादा पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे हे स्वतः शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, आवडते विषय तसेच शेतीतील अडचणी जाणून घेत होते.
विशेषतः AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस व भाजीपाला प्रात्यक्षिक प्लॉटकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा उपयोग करता येईल, याबाबत शेतकरी सविस्तर माहिती घेत होते. याचबरोबर पशु प्रदर्शनामध्ये कोंबड्या, विविध जातींच्या गाई, म्हशी, शेळ्या यांची माहिती घेण्यासाठीही शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती.


दरम्यान, आज बारामती येथून सायकल स्पर्धेचा मार्ग असल्याने प्रदर्शन स्थळी येणारे काही मार्ग दुपारी काही काळ बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रदर्शन एक तास उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आले.
हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक, किफायतशीर व शाश्वत शेतीकडे मार्गदर्शन करणारे ठरत असून सदर कृषी प्रदर्शन शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here