शेतीमधील शेतमालाचे प्रभावी विपणन ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज-श्री राजेंद्र पवार

0
4

शेतीमधील शेतमालाचे प्रभावी विपणन ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज-श्री राजेंद्र पवार

दिनांक 24 ते 26 ऑगस्ट 2026 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आत्मा वाशिम यांच्या 53 शेतकऱ्यांचे 3 दिवशीय सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती: उत्पादन, विपणन व ब्रॅण्डिंग या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम पार पडले.

सदर प्रशिक्षणादरम्यान डॉ धीरज शिंदे, KVK प्रमुख, यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीची पार्श्वभूमी आणि सदर प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला.

श्री संतोष गोडसे, विषय विशेषज्ञ, यांनी शेतकऱ्यांना केंद्राच्या
वेगवेगळ्या उपक्रमांची आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयसुविधांची माहिती दिली.

डॉ रतन जाधव, माजी विषय विशेषज्ञ, यांनी कृषिपूरक व्यवसाय यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय यासंबंधी माहिती दिली.
तसेच श्री अल्पेश वाघ यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती प्रामाणिकरण,आवश्यक निविष्ठा व बाबी, परस बागेमधील सेंद्रिय भाजीपाला निर्मिती,
इ.विषयी मार्गदर्शन केले.

श्री समाधान खूपसे यांनी PMFME योजना,निर्माण केलेला सेंद्रिय शेतमाल विक्री व ब्रॅण्डिंग याविषयी तर श्री दत्तात्रय पवार यांनी जैविक खते व औषधे यांचे महत्व आणि त्यांची निर्मिती तसेच जैविक निविष्ठा वापरून शेती
मधील कीड आणि रोगनियंत्रण या विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

तसेच शेतकऱ्यांनी केंद्राच्या सर्व विभागांना यामध्ये अत्याधुनिक स्मार्ट शेती तंत्रज्ञान वापरून तयार केलेले ऊस, केळी, तूर पिकाचे प्लॉट,मत्स्यपालन,नर्सरी, प्रक्रिया उद्योग,कुक्कुटपालन,
शेळीपालन, गायी म्हशीमधील अनुवंश सुधार प्रकल्प इ विभागांना भेटी दिल्या.

प्रशिक्षण समारोपाच्या वेळी संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीने शेतीचे महत्व, सेंद्रिय शेती व त्यानुसार शेतीमालाचे प्रभावी विपणन यावर शेतकऱ्यांना संबोधित केले.तसेच त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये वाशिम जिल्ह्यामधील वेगवेगळ्या तालुक्यांमधून 15
महिला शेतकरी आणि 38 पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

सदर प्रशिक्षण हे प्रकल्प संचालक, आत्मा वाशिम यांचे अंतर्गत आणि आत्माचे -जिल्हा व्यवस्थापक,श्री जयप्रकाश लव्हाळे यांच्या देखरेखी खाली कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे यशस्वीरित्या पार पडले.

Previous articleराखी पौर्णिमेनिमित्त अजितदादांच्या पुतळ्याला राखी बांधून अभिवादन..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here