अजितदादांना गीत-संगीतातून आदरांजली..!
नटराज कला नाट्य मंडळातर्फे २८ ऑगस्ट रोजी स्मृतिदिनाचे आयोजन
बारामती : नटराज कला नाट्य मंडळ, बारामती यांच्या वतीने ‘आठवणीतून अजितदादा’ या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नटराज कला मंदिर, तिरंगा सर्कल, बारामती येथे होणार आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीपर हिंदी-मराठी गीतांच्या माध्यमातून अजितदादांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रातील योगदान, विकासाचा ध्यास, शेतकरी ते जवान तसेच क्रीडा क्षेत्रापासून उद्योग क्षेत्रापर्यंत केलेले कार्य आणि समाजकारणातील योगदान यांची आठवण या कार्यक्रमातून जागविण्यात येणार आहे.
“सर्वांसाठी हृदयसंकल्प, विश्वासाने पुरा समर्पण… राजकारण से समाजकारण, पुरोगामी विचारों में मन…” अशा भावनेतून अजितदादांच्या कार्याला गीत-संगीतातून मानवंदना देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास नागरिक, कला-रसिक तसेच अजितदादांच्या कार्याशी जुळलेले मान्यवर व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नटराज कला नाट्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



