बारामती गणेश फेस्टिव्हल यंदा रद्द; केवळ गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होणार..!

0
7

बारामती गणेश फेस्टिव्हल यंदा रद्द; केवळ गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होणार..!

बारामती : नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा बारामती गणेश फेस्टिव्हल यंदा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेस्टिव्हलचे संस्थापक माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे संस्थेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली.
दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या या गणेश फेस्टिव्हलऐवजी यंदा केवळ गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने हा निर्णय घेतला असून, त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
नटराज नाट्य कला मंडळाच्या या निर्णयामुळे बारामतीतील सांस्कृतिक व गणेशोत्सवाच्या वातावरणात यंदा साधेपणा पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here