बारामती येथे १५ ऑगस्टला शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
बारामती,दि.११: भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम इंदापूर रोडवरील नवीन प्रशासकीय इमारत, येथील कार्यालयाच्या आवारात उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमास प्रशासकीय भवनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
०००००



