रुई येथील ‘किडोज प्ले स्कूल’मध्ये पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत; भक्तिरसात न्हाऊन निघाला परिसर

0
47
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

रुई येथील ‘किडोज प्ले स्कूल’मध्ये पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत; भक्तिरसात न्हाऊन निघाला परिसर

बारामती, रुई :
बारामती तालुक्यातील रुई येथील स्वरा एज्युकेशनल सोसायटीचे ‘किडोज प्ले स्कूल’ (किडोज प्ले स्कूल) पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्तश्री व सौ उमाप यांनी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि भक्तिरसाने भारावून गेला.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग, पालक,गावकरी मंडळी मित्रपरिवार तसेच पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भजन, हरिपाठ, विविध सांप्रदायिक पसायदान, अभंग गायन, ‘मागणे आधी’ तसेच पारंपरिक फुगडीच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
शाळेच्या परिसरात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आकर्षक मूर्ती, पालखीची सुंदर प्रतिकृती, मनमोहक रांगोळी आणि पारंपरिक सजावटीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. शाळेने केलेली ही देखणी सजावट उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली.
यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेवर आधारित पथनाट्य सादर केले. त्यांच्या निरागस आणि प्रभावी अभिनयाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अनेकांनी या सादरीकरणाचे भरभरून कौतुक करत चिमुकल्यांना दाद दिली.


वारकरी संप्रदायाची संस्कृती, भक्ती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. रुई येथील किडोज प्ले स्कूलमध्ये पालखी दिंडीचे झालेले हे भावपूर्ण स्वागत उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेक वारकरी आणि नागरिकांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here