माळेगाव सहकारी साखर कारखान्याची गतिमान यंत्रणा; सभासदांच्या मागणीनुसार रस्ता झाला मोकळा..!

0
5

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची गतिमान यंत्रणा; सभासदांच्या मागणीनुसार रस्ता झाला मोकळा..!

मळद गाव परिसरातील सभासदांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे रस्त्यालगत वाढलेल्या वेड्या बाभळीच्या काटेरी झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत कारखान्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे-झुडपे हटविण्याचे काम हाती घेतले आहे.
आज गवारे फाटा तसेच मायनर क्रमांक २ परिसरात वेड्या बाभळीची झाडे काढून रस्ता स्वच्छ व सुरक्षित करण्याचे काम सुरू करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकरी, वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी सभासद नाना गावडे, श्रीराम परकाळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कारखान्याने सभासदांच्या मागणीला तत्पर प्रतिसाद देत काम सुरू केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याची ही कार्यक्षम आणि गतिमान यंत्रणा सभासदांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Previous articleकेतन अग्रवाल प्रकरण : समाज आणि तरुणाईसाठी एक गंभीर संदेश…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here