“बारामतीचा श्वास अजून जिवंत आहे… अजितदादांच्या सावलीतून सुनेत्रा पवारांचा नवा प्रवास!”

0
75

“बारामतीचा श्वास अजून जिवंत आहे… अजितदादांच्या सावलीतून सुनेत्रा पवारांचा नवा प्रवास!”

“बारामती श्वास आहे… बारामतीचा लढा ना थांबला, ना थांबणार!”
हे वाक्य फक्त घोषवाक्य नव्हतं, तर अजितदादांच्या मनात चाललेल्या विकासदृष्टीचा आरसा होता. त्यांचा विश्वास काय होता,
काका आणि पुतण्या या दोघांनी सबंध महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचे कार्य पवार घराण्याने महाराष्ट्राला दिलेलं नेतृत्व अद्वितीय आहे काका शरदचंद्र पवार आणि पुतणे अजित पवार हे नातं फक्त रक्ताचा नाही तर कार्याचे आहे शरद पवारांनी घडवलेली राजकीय परंपरा त्यांची दूरदृष्टी आणि संघटन कौशल्य अजित पवार पुढे नेत होते काकांच्या पाठबळावर आणि स्वतःच्या धडाडीवर उभा असलेला हा पुतण्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या पहिल्या रांगेत ठामपणे उभा होता पवार परिवार म्हणजे समाजाशी एकरूप झालेल कुटुंब शरद पवारांनी बी लावलं अजित पवारांनी त्या बीजाला फळ दिली सुप्रिया सुळे याच लोकसभा कामकाज असो किंवा अजित पवारांचे प्रशासनातील धडाडीचे नेतृत्व पवार कुटुंबातील प्रत्येक जण समाजसेवेची परंपरा जपत आहे बारामतीकरांचे सुख दुःख आनंद व्यथा हे पवार घराण्याने स्वतःच समजून त्यात सहभागी होण्याची संस्कृती पिढ्यानपिढ्या चालू आहे महाराष्ट्राचा आधार असलेले अजित दादा पवार हे जरी निघून गेले असले तरी त्यांचे गुण अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थकारणाला बळ दिलं कठोर परिश्रम पारदर्शकता आणि प्रमाणिकपणा या तीन गोष्टीमुळे अजित पवारांना महाराष्ट्र काम करणारा नेता म्हणून मानतो त्यांच्या पुढारकाराने लाडकी बहीण योजना सिंचन प्रकल्प औद्योगिक गुंतवणूक पायाभूत सुविधा या सगळ्यांनी महाराष्ट्र विकासाच्या नकाशावर ठळकपणे चमकतो आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विकास पुरुष अजितदादा पवार बारामती चा अभिमान महाराष्ट्राचा आधार होता हे मात्र नक्की….!

अपेक्षा काय होत्या, हे अनेकदा शब्दांत मांडलं गेलं नाही—पण बारामतीच्या प्रत्येक रस्त्यात, इमारतीत, संस्थेत ते स्पष्टपणे दिसत राहिलं.
बारामतीत शासकीय कार्यालयं, रुग्णालयं, महाविद्यालयं, प्रशासकीय यंत्रणा, उप-पोलीस मुख्यालय उभं राहिलं. लोकसंख्या वाढली, रहदारी वाढली, जबाबदाऱ्या वाढल्या. आपण अभिमानाने म्हणतो—बारामतीचा सर्वांगीण विकास झाला आहे.
पण त्याचवेळी काही प्रकल्प अपूर्ण आहेत, काही इमारती अजूनही शांत उभ्या आहेत, काही ठिकाणी कामकाजाची प्रतीक्षा आहे—हे वास्तवही नाकारता येणार नाही.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादांना या सगळ्यांचा ताळमेळ घालणारी, पुढच्या पिढीचा विचार करणारी विकासनीती अपेक्षित होती. बारामती फक्त आजसाठी नव्हे, तर उद्यासाठी घडवायची—हीच त्यांची खरी भूमिका होती.
आजवर शरद पवार साहेब, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामतीचा कारभार समर्थपणे सांभाळला गेला. पवार कुटुंबीय मागे ठामपणे उभे होते, कार्यकर्ते विश्वासाने चालत होते.
मात्र दि.२८ बुधवार ८ दिवसापूर्वी च्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने महाराष्ट्र सह बारामतीच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.
“अजितदादा गेले… आता आपलं काय?”
“सुप्रियाताई, पोस्ट, —सर्व उद्ध्वस्त !”
ही भीती खरी आहे, भावना खरी आहे. पण याच भावनांतून नवी आशा जन्म घेत आहे.
आज महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद, बारामतीचे पालकत्व—हे केवळ पद नाही, तर जनतेच्या अपेक्षांचं ओझं आहे.
राजकारण त्यांच्यासाठी नवं नाही. अजितदादांच्या सावलीत, अनुभवातून त्यांनी राजकारणाची बारकावे समजून घेतली आहेत. पद्मविभूषण देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचा प्रदीर्घ अनुभव, सुप्रिया सुळे , रोहित पवार यांची साथ, आणि पवार कुटुंबीयांची एकजूट—हे त्यांचे आधारस्तंभ आहेत. जय आणि पार्थ,आणि यूगेंद्र ही पुढची पिढी त्यांच्यासोबत उभी आहे.
आज बारामतीचा सामान्य कार्यकर्ता, सामान्य बारामतीकर एकच अपेक्षा ठेवून पाहतो आहे.

“आपुलकी, पालकत्व, समजूतदारपणा आणि ठाम निर्णय.”
सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मायाळू पण ठाम, संवेदनशील पण निर्णायक, आणि विश्वास जपणारं असावं—अशीच अपेक्षा आहे. बारामतीचा विश्वास अबाधित ठेवत, अपूर्ण कामांना गती देत, शहराची सुंदरता, हरितता, स्वच्छता आणि नियोजनबद्ध विकास साधणं हीच खरी कसोटी आहे.
आज फक्त बारामती नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहील—असं चित्र दिसू लागलं आहे.
कारण नेतृत्व हे फक्त ताकदीने नाही, तर आपुलकीने आणि विश्वासाने घडतं.
बारामतीचा श्वास अजून थांबलेला नाही…
तो आता नव्या नेतृत्वाच्या तालावर पुढे धडधडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here