आज पवार चौकट एकाच मंचावर! विद्या प्रतिष्ठानमध्ये AI कार्यशाळा आणि राजकीय सौहार्दाचा नवा अध्याय!

0
21


पवार चौकट एकाच मंचावर! विद्या प्रतिष्ठानमध्ये AI कार्यशाळा आणि राजकीय सौहार्दाचा नवा अध्याय!

बारामती, संपादक भावनगरी (संतोष शिंदे )९८२२७३०१०८

राज्याच्या राजकारणात जरी वेगवेगळ्या वाटा असल्या, तरी बारामतीच्या मातीत पुन्हा एकदा ‘पवार चौकट’ एकत्रितपणे एकाच मंचावर झळकणार आहे. निमित्त आहे – विद्या प्रतिष्ठान, बारामती आयोजित “AI करिअर मार्ग: कृत्रिम बुद्धिमत्तेतील संधींचा शोध घेणे” या एकदिवसीय भव्य कार्यशाळेचे! २० जून २०२५ ग.दि.मा. सभागृह, विद्यानगरी, एमआयडीसी या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर दिसणार आहेत राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील ‘पवार’ घराण्याचे चार दिग्गज चेहरे: आदरणीय शरदचंद्रजी पवार – अध्यक्ष, विद्या प्रतिष्ठान
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुनेत्रा पवार
राजकीय रंगमंचावर वेगवेगळे झेंडे हातात घेणाऱ्या या कुटुंबीयांचे एकत्रित दर्शन हे बारामतीकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खास दृश्य ठरणार आहे.
AI कार्यशाळेची झलक – नवयुगाच्या दिशेने प्रबुद्ध पाऊल! विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा म्हणजे बारामतीच्या शैक्षणिक वाटचालीतील एक ऐतिहासिक पाऊल आहे. AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधी उलगडण्याचा हेतू असलेल्या या उपक्रमात सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ: श्री. अच्युत गोडबोले – ज्येष्ठ लेखक व तंत्रज्ञान अभ्यासक डॉ. आदित्य अभ्यंकर – अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ डॉ. वेदांत आहलुवालिया –व्यवस्थापकीय संचालक, DATA VIV टेक्नोलॉजीज कार्यशाळेतील ठळक वैशिष्ट्ये:
AI, रोबोटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग व सायबर सिक्युरिटी यावरील व्याख्याने व प्रात्यक्षिक सादरीकरणे
कृषी, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात AIचा वापर
करिअर मार्गदर्शन व जागतिक स्तरावरील संधी विद्यार्थ्यांना प्रगत AI टूल्स शिकण्याची संधी
संपूर्ण बारामतीसाठी एक सुवर्णसंधी! कार्यशाळेचे आयोजन करणारे प्रमुख: अ‍ॅड. अशोक प्रभुणे – उपाध्यक्ष, विद्या प्रतिष्ठान
अ‍ॅड. नीलिमा गुजर – सचिव
कार्यकारी मंडळ व व्हीपीकेबीआयईटी बारामती
या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना नवसंधींचा मंत्र, शिक्षकांना नवीन शिकवणी दृष्टीकोन, आणि पालकांना भविष्यातील शिक्षण नकाशा मिळणार आहे.

भावनगरी विशेष निष्कर्ष:
पवार मंच, AI युग, आणि बारामतीची घौगडगर्दी!
या दिवशी बारामती केवळ शैक्षणिक केंद्र नव्हे, तर राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक विचारांच्या संगमाचे केंद्र ठरणार आहे. कार्यशाळा म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचे व्यासपीठ नव्हे, तर पवार कुटुंबाच्या एकात्मतेचे प्रतीक बनणार आहे.
आपण तयार आहात का AI युगात पहिले पाऊल टाकायला?
तर मग – २० जून रोजी, ग.दि.मा. सभागृहात नक्की उपस्थित राहा!
भावनगरी, जेथे बातम्यांना मिळते हृदयाचा ठाव!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here