आज बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने पाटण तालुक्यातील भोसगाव येथे झालेल्या अत्याचारा विरोधी बारामतीत जाहीर निषेध…
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने पाटण तालुक्यातील भोसगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर शरियावादी नराधमाने शारिरीक छळ करून तिचे लैंगिक शोषण केले.
आणि कुटुंबाला संपवून टाकण्याची त्या ठिकाणी धमकी दिली.
या घटनेचा आज दिनांक 06 शुक्रवार रोजी बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने बारामतीतील मुख्य भिगवन चौक येथील हुतात्मा स्तंभ येथे निषेध करण्यात आला.
संबंधित अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा, शासन करावे, त्याची गावातून धिंड काढून पुन्हा जेणेकरून असे कृत्य अशी घटना घडणार नाही.
या मागणीचे बारामती तालुका नाभिक समाज भावनांचे निवेदन बारामती पोलीस स्टेशनला देण्यात आले.
बारामती शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष पै. सुधाकर माने ,किरण कर्वे ,नवनाथ आपुणे ,प्रा. सुरेश साळुंके , महेंद्र यादव,हेमंत जाधव, महेश वारुळे,आकाश काळे, संतोष शिंदे,दत्तात्रय सपकाळ महाले, रोहन शिंदे, गणेश चौधरी ,अनिल खांडेकर ,माधव गवळी, आदेश आपुणे, नंदू पोळ, अनिल दळवी, दत्तात्रय साळुके,विकास साळुंके, शामराव साळुंके, संतोष काशीद ,शंकर जाधव, संतोष पवार ,बापूराव साळुंके, गणेश काळे ,विकास वाघमारे, श्रीकांत साळुंके, गणेश ठोंबरे ,अनिल जाधव, संकेत झेंडे, नवनाथ देवकर यांच्यासह अन्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते.