मनोज जरांगे पाटलांना पाठींबा मराठा आरक्षणासाठी बारामतीतील समस्त मुस्लिम समाज बांधव मैदानात..

0
256

मनोज जरांगे पाटलांना पाठींबा मराठा आरक्षणासाठी बारामतीतील समस्त मुस्लिम समाज बांधव मैदानात..

बारामती: आंतरवली सराटी येथे श्री मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलनासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठींबा व बारामती येथील सुरु असलेल्या आमरण व साखळी उपोषणास समस्त मुस्लीम समाज बांधवांचा जाहीर पाठींबा.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य सकल मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने करीत आहे.श्री. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षाणासाठी सतत उपोषण सुरु आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत आहे. सन १९६७ पूर्वीचे म्हणजे दिनांक पूर्वीचे पुरावे पाहिले असता काही नोंदी नाही व काही नोंदी मराठा जाती विषयी दस्तावेजात दिसून येतात. सदर समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा अत्ताच्या लोकसंख्खेच्या प्रमाणात शेतीत अल्पभूधारक असून त्यांचे शेती हाच व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहचे साधन दिसून येत आहे. निसर्गाची अवकृपा शेतीतील मालाला हमीभाव नसणे,दुधाला हमी भाव नसल्याने यामुळे मराठा समाजाचे अर्थ कारण बिघडले असल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षणाची गरज असुन अनेक तरुणांनी दुर्दैवाने आत्महत्यांचे प्रमाण स्वीकारले आहे त्यामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही न्यायिक आहे. आणि मराठा समाजाच्या या न्यायिक मागणीस बारामती शहर व परिसरातील समस्त मुस्लिम समाज बांधव यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात कायदेशीर अडचणीमुळे टिकू शकले नाहीत. म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार या द्वारे विनंती करतो की, न्यायालयीन कसोटीवर टिकेल असे आरक्षण सकल मराठा समाज बांधवांना मिळाले पाहिजे.राज्य शासनाने मराठा समाजास कोणतेही कायदेशीर त्रुटी न ठेवता आणि वेळ काढू पणा न करता तत्काळ मराठा आरक्षण जाहीर करावे जेणेकरून आमच्या मराठा बांधवास न्याय मिळेल. तसेच केंद्र व राज्य सरकारने अधिकचा वेळ न घेता मराठा समाजाच्या भावना ओळखून लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवून मराठा समजास आरक्षण जाहीर करावे, तसे न झाल्यास बारामती मुस्लिम समाज बांधव या अंदोलनाला पाठींबा म्हणून साखळी उपोषण करतील असा इशारा बारामती शहर व परिसरातील समस्त मुस्लिम समाज बांधव यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी मुस्लिमांचा मराठा बांधवांना नेहमी साथ व सहकार्य राहिले आहे तसेच मुस्लिम समाज नेहमी सामाजिक पुरोगामी ऐक्यचा विचार घेऊन फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराला बांधील राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here