HomeUncategorizedकुणबी महाराष्ट्रातील एक शेतकरी जात पुर्वी कुणबी हि जात नव्हती नुसता धंदा...

कुणबी महाराष्ट्रातील एक शेतकरी जात पुर्वी कुणबी हि जात नव्हती नुसता धंदा होता…!

कुणबी महाराष्ट्रातील एक शेतकरी जात पुर्वी कुणबी हि जात नव्हती नुसता धंदा होता.कुलपती या शब्दावरुन कुलपती
कुळई कुळवी असा हा शब्द बनला असावा.कुंटुंम्बीन या संस्कृत शब्दावरुन हा शब्द बनला असावा.कसे हि एक मत आहे.कुणबी व मराठे यांच्यात फारसा फरक नाही.कुणबी श्रीमंत झाला की, मराठ्या प्रमाणे राहु लागतो व स्वतःला मराठा म्हणवतो.सावंतवाडी रत्नागिरी व गोवे या भागात यांना कुळवाडी असे म्ज्ञणतआत गुजराथेंत यांना कुणबी म्हणतात.कुणब्याचे मराठा कोकणी खान्देशी तिलहेरी व काळे कुणबी असे पाच भेद आहेत.मल्हारी कोळी हि आता स्वतःला कुणबी म्हणु लागले आहे.

मराठा कुणबी- यांच्यात कुळे व देवके असतात. एकाच नावाच्या कुळात वाट देवकाते सोयरिक होत नाही बालविवाह रुढ असला तरी ऋतु प्राप्ती नंतर हि मुलीचे लग्न होते.

काही मराठा कुणब्यात पाट लावणे कमी पणाचे मानतात.विधवेचे लग्न विधुरा बरोबरच झाले पाहिजे असा नियम आहे.त्याच्यात मामे बहिणीशी लग्न होते.

यांचे पैकी बरेच जण वारकरी आहेत हे फळ पेरणी कापणीच्या वेळी भैरोबाला पुजतात खंडोबा व देवीचे हि दैवते आहे.

कोकणी कुणबी यांची वस्ती मुख्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यात असुन त्यांना तिळोरी असे म्हणतात यांच्यात कुळे नाहीत.पण एकाच आडनावाच्या घराण्यात लग्न होतं नाही घटस्फोट रुढ नाही लग्न मराठा कुणब्या प्रमाणेच लावतात बहिरी जुगाई नवलाई हि मुख्य दैवते.

कोकणातले कुणबी मुख्यतः शेतीवर उपजीविका करतात पण जमिनीचे मालक मात्र फारच थोडे जण असतात. बहुतेक जण जमीनदाराच्या शेतीवर मंजुरी करतात हे कुणबी देशावरच्या कुणब्यांना जास्त हलाखीत असतात पूर्वी यांच्या पंचायती असतं.व तेथेच तंटे मिटवले जात गौरी गणपती व शिमगा हे मुख्य सण

खानदेशी कुणबी
यांच्यात सात शाखा आहेत घाटोळे हे अंजटा घाटावरील आले २) लोणी -गिरणा व तापी नदीच्या काठी राहतात कुंभार, वंजारी पाजणे तिडोळे/तिरोळे हे उत्तर हिंदुस्थानातुन आले.मदराज या सात हि शाखा एकमेकाच्या हातचे खातात रोटी व्यवहार करता पण आपलीच शाखा श्रेष्ठ आहे असे मानुन एकदुसऱ्याशी बेटी व्यवहार करीत नाही.

तलहरी कुणबी ठाणे जिल्ह्यात घाटा खाली यांची मुख्य वस्ती आहे.यांच्यात काही स्थानिक काही गुजरात मधुन व काही घाटावरून आलेले लोक आहेत स्थानिक कुणबी व सोनकोळी यांच्यात फारसा फरक नाही.यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतो.

काळे कुणबी वर्णाने काळे असल्यामुळे त्यांना हे नाव पडले.यांची वस्ती बेळगाव व कानडा ( कारवार मंगरुळ या जिल्ह्यात आहे) हे मुळचे गोव्याकडील असुन पोर्तुगीजाच्या धर्मछळामुळे इ.स.च्या १६०० शतकात तिकडे गेले असे म्हणतात.यांची बोली कोकणी आहे‌.यांच्या प्रत्येक गावात एक मिराशी व गावठाण असतो.मिराश्याचे काम धार्मिक व गावड्यांचे सामाजिक असते. यांच्यात कुळे असुन त्या प्रत्येकाची देवदेवता निराळी असते.लग्न विधीसाठी लिंगायत किंवा ब्राह्मण पुरोहित असतो.या कुण्या पैकी काही लिंगायत पंथाचे असुन ते जंगम उपाध्ये नेमतात.बसवेश्वर व नंदी यांची पुजा करतात प्रेत पुरतात.गर्भाशी किंवा बाळातिंण मेली तर तिला दुर नेऊन पुरतात वन्य पशु पक्ष्यांचे मांस खातात पण पाळीव प्राण्यांचे खात नाहीत.

वऱ्हाडी कुणबी मध्यप्रदेश व वऱ्हाड या भागात कुणब्याची वस्ती बरीच आहे हे गुजरात मधुन खानदेशात व तेथुन वऱ्हाड व मध्य प्रदेशात इ.स.१४०० व्या शतकात आले त्यांचा शाखा झाडे, मानवा, खैरे ,धानोरे, तिरोळे हे उच्च दर्जाचे असुन यांच्यात देशमुखाधी वतनदार आहेत छिंदवाड्यात गाढव जातीचे कुणबी आहेत. हे पुर्वी गाढवे पाळीत नेमाडात गुजर कुणबी आहेत या शेतकऱ्यांला कुणब्याला खेड्यातले सर्व आलुते बलतेदार बळीराजा म्हणतात कारण त्यांच्यामुळे अन्नधान्य मिळते.शेतीच्या कष्टाचे शरीर बलिष्ठ होते म्हणुन हि त्यांना कदाचित बळी म्हणण्याचा रिवाज पडला असेल

आण्णां धगाटे

जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता
(संदर्भ भारतीय संस्कृती कोष खंड २)…!

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on