31 जुलै 2023 रोजीपर्यंत इनकम टॅक्स फाईल करणे आवश्यक
आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशातील सर्व करदात्यांना आयटी रिटर्न भरणे आवश्यक आहे.यासंबंधीची मुदत निश्चित करण्यात आली आहे. 31 जुलै 2023 रोजीपर्यंत इनकम टॅक्स फाईल करणे आवश्यक आहे. आयटीआर फाईल (ITR File) करण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात येणार नाही. जर ही डेडलाईन चुकली तरीही तुम्हाला आयटीआर फाईल करता येईल. पण त्यावेळी दंडाची रक्कम भरावी लागेल. ITR भरण्याची मुदत आता जवळ आल्याने अनेक जण चूक होऊ नये यासाठी काळजी घेतात.
ते सीए ला गाठतात. त्याच्याकडून आयटी रिटर्न भरुन घेतात. काळजी घेतल्यास तुम्ही पण ऑनलाईन आयटीआर सहज भरु शकता.Form 16 आवश्यकतुम्ही ज्या कंपनीत काम करत आहे, तिच्याकडून फॉर्म 16 घ्या. कंपनीने अद्याप फॉर्म 16 दिला नसेल तर तुम्हाला घाई करणे आवश्यक आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी फॉर्म 16 ची आवश्यकता आहे. लवकरात लवकर आयटीआर फाईल करणे तुम्हाला गरजेचे आहे.
नाहीतर गडबडीत जास्त चुका होऊ शकतात आणि मग हा सर्व द्रविडी प्राणायाम कसल्याचा उपयोगाचा ठरत नाही.तुम्ही ई-फाईलिंग पोर्टल अथवा चार्टर अकाऊटंट यांच्या माध्यमातून आयटीआर फाईल करु शकता. तुम्हाला सीए विना आयटीआर फाईल करायचा असेल तर तुम्हाला आयकर खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. याठिकाणी तुम्ही ऑनलाईन आयटीआर फाईल करु शकता.