10 वी बोर्ड परीक्षेच्या निकालामध्ये आचार्यच्या विद्यार्थ्यांची बाजी..
बारामती :
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात बारामतीच्या १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. एकुण १२२ मुलांपैकी १०८ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. यातील ३९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून संस्कृती भोसले या विद्यार्थिनीने सर्वांत जास्त ९७ .४० टक्के गुण, सानिका भापकरने ९५. ४० टक्के गुण तर सोहम शिंदे यांने ९५ टक्के गुण मिळविले आहेत.
याखेरीज १४ विद्यार्थ्यांनी ८९ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळविले आहेत. फक्त गणीत विषयाचे गुण पाहिले तर २ विद्यार्थ्यांनी १०० गुण तर १०७ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. विज्ञान विषयात १०१ विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पेक्षा जास्त गुण मिळवून उर्तीर्ण झाले आहेत.
उत्तम आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, अॅकॅडमीमधील अभ्यासाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम यातूनच एवढे मोठे यश मिळाल्याचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी सांगितले. संचालक सुमीत सिनगारे, प्रविण ढवळे आणि कमलाकर टेकवडे यांनी विद्यार्थ्यांचे अभीनंदन केले. फोटो – पहिली – संस्कृती भोसले, दुसरी – सानिका भापकर, तिसरा – सोहम शिंदे
