५ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने आई-वडील हातबल..
बारामतीचे डॉ. मुथा व त्यांच्या टीम तत्परतेमुळे ‘ सैफ ” ला वेळीच उपचार…!
कळस -पाच वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा प्राण घातक हल्ला…!
सैफ शकील मुलानी कळस – वय – ५ वर्ष सकाळी ६ वाजता कुत्रा चावला , व जबडा पूर्ण फाटला होता. म्हणून
आज दि.०२ सोमवार रोजी सैफ यास कुत्रा चावला म्हणून शकील मुलाणी यांनी आपल्या मुलाला घेऊन सकाळी ७ वाजता श्रीपाल हॉस्पिटलला पोहोचले. व हा सर्व प्रकार पाहून डॉक्टर सौरभ मुथा यांनी वेळ वाया न घालवता साहेब वर त्वरित उपचार सुरू केले.
पुढील शस्त्रक्रियेसाठी श्री स्वामी डॉ. राजेंद्र मुथा डॉ. सौरभ मुथा, डॉ ऋषी स्वामी, डॉ. प्रियंका सुधा -हयांना व श्रीपाल स्टाफ यांनी वरील धावपळ करून घटनेचे गांभी र्थ ओळखून सदर पेशंटवर उपचार केले साधारणत ५० ते ६० टाके त्या मुलास पडले, व त्यास इमिनोग्लोख लिन (Immunoglobulin) म. लसीकरण देण्यात आल्याची माहिती डॉक्टर सौरभ मुथा यांनी दिली.
डॉ. मुथा यांची समयसूचकता – यामुळे डॉ. स्वामीच्या कौशल्यामुळे सैफ हयास जीवदान मिळाले.श्री. शकील यांनी डॉ. मुथा तुम्ही आमच्या मुलाच्या करिता मसीहा ‘आहात’ असे संबोधल माझा एकूलता एक मुलगा आहे – त्यास वाचविले म्हणून खूप मनापासून आभार शकील मुलांनी यांनी मानले.