सत्तेच्या माजाने संतोष संपवला…. नरराक्षसांच्या कौर्याने महाराष्ट्र सारा हादरला

0
14

रक्तरंजीत महाराष्ट्रा..ओशाळली माणुसकी,सुन्न झाली रे मने…! ईव्हिएम हटवा,गुन्हेगार संपवा… देश वाचवा..!

सत्तेच्या माजाने संतोष संपवला…. नरराक्षसांच्या कौर्याने महाराष्ट्र सारा हादरला!

रक्तरंजीत महाराष्ट्रा..ओशाळली माणुसकी,सुन्न झाली रे मने…! ईव्हिएम हटवा,गुन्हेगार संपवा… देश वाचवा..!

संजय एम.देशमुख (निंबेकर) अकोला
ज्येष्ठ पत्रकार

मोबा.क्र.९८८१३०४५४६

महाराष्ट्रात वाढले  गुन्हेगारीचे बिहारी ड्रामे! राजकारण्यांच्या कुळातच नांदती येथे नरराक्षसांची बिळे..‌..! उध्दरली राजकारण्यांची कुळे त्यांनीच फुलवले गुन्हेगारी भुईछत्र्यांचे मळे...आता विनाशाच्याच वाटेवर उभी आहेत समाजातली पोरे...! आता अलिबाबा चाळीस चोर नाहीत,तर  हजारोंच्या टपोरी फौजांचे अनभिषिक्त सरदारच महाराष्ट्राच्या समोर आले आहेत.पूर्वीचे शौर्य निष्ठेसाठी होते. तरूणांचे सळसळते रक्त देशासाठी सांडले जायचे.मातृभुमिला परदास्यातून मुक्त करण्यासाठी धाडसी संकल्पांचे विडे उचलणारे तरूण पूर्वी होते.त्यांना घडविण्यामागे आदर्शांच्या प्रेरणा,संस्कारांचे प्रभाव आणि नैतिकतेचे बळ होते.आता राष्ट्रप्रेम हरवले.मानवतेचा प्रकाश टोळी माफियांच्या अंधार गोठडीत गडप झालाय.माणसांच्या वस्तीत राहणारी माणूस म्हणून ओळख धारण केलेली माणसं आता संपली. माणसांऐवजी हातात कोलितं असललेली माकडं नरराक्षसांचे मुखवटे धारण करून स्मशानातील तांडवं करायला लागलीत. सत्ता, संपत्ती, गैरअधिकार आणि पापाच्या पैशांपुढे माणसाची आयुष्ये किती स्वस्त झालीत? .म्हणूनच नैतिकतेने संषर्ष करणाऱ्या मस्साजोगच्या सरपंचाला स्वत:च्या प्राणाची आहूती द्यावी लागली. माणसुकी हरविलेल्या हैबानी गिधाडांच्या जमातीने त्याच्या शरीराची विटंबना केली.एका माणसाला संपविण्यासाठी टोळीने एकत्र झाली. त्याचे आयुष्य त्यांच्या कौर्याने अखेर हिसकावून घेतलेच !
   कारखाना बंद पडू नये,लोकांचा रोजगार वाचावा यासाठी संतोष देशमुख यांचा अनैतिक चोऱ्या आणि खंडणीच्या वसुल्या करणाऱ्या या बेईमान टोळीला विरोध होता.चुकीच्या गोष्टींना विरोध हा सामाजिक लोकांचा पिंड असतो.परंतू आपल्या आकांना आर्थिक दुष्ट्या बलंदंड करीत राजकीय बाहू मजबूत करणाऱ्या या अनैतिक साम्राज्याआड कोणी येऊ नये ही या मवाली टोळ्यांची ईच्छा असते.म्हणून त्यांचा दबदबा वाढवून त्यांचे मुळापासून पोषण करण्यात राजकीय आश्रयाचे छत्र उभारून त्यांना फोफावत ठेवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या मदती पुरविण्याची काळजी आकांचे आका हे नेहमी घेत असतात. हे देशातील आणि महाराष्ट्राचे भयावह चित्र सदाचारी माणसांच्या समाजाला संपवणारे आहे.

   संतोष देशमुखांसारखे प्रामाणिक,आक्रमक समाजसेवक निर्माण होणे हे समाचाचं भूषण आहे.परंतू ते निर्माण होऊन सामाजिक विकासासाठी आकार घेत असतांना वाल्मिकक कराडांसारखे यमदुत त्यांना मध्येच संपवण्याची कटकारस्थाने करत असतील तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे किती प्रचंड प्रमाणात अध:पतन झाले आहे, यावर राजकीय नेत्यांनी चिंतन केलं पाहिजे.कारण भविष्यात कुणाच्या प्राणाची हमी नाही.ही संकटं कमी अधिक फरकाने अनेकांना ग्रासणार आहेत.मग या राज्यातील राजकारणी अजूनही स्वत:चे वर्चस्व,सत्ता आणि अर्थकारणासाठी असली बांडगुळं पोसण्याची कामंच करत राहणार का? या अनाचाराच्या वणव्यात किती निरपराधांचे बळी देत राहणार ? राजकारणी हे जनतेचे रक्षक आहेत की समाजभक्षक हा यावर विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.त्यासाठी ही निवडणूक प्रक्रियाच बदलणं आवश्यक आहे.जनतेच्या  पसंतीचे उमेदवार जर निवडता येत नसतील तर ती लोकशाही नक्कीच  हुकूमशाहीमध्ये विलीन झालेली आहे.म्हणून आका आणि आकांच्या आकांना माजण्यासाठी मोकळे कुरण निर्माण करणाऱ्या लोकशाहीच्या या प्रायोजित तमाशांना बळ  ईव्हीएमचे बळ दिलेले आहे. हा करंट संपवून ईव्हीएम विरूध्दचा लढा उभारणे आता क्रमप्राप्त आहे.त्यासाठी  मतदारांनी आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलं  पाहिजे..!

  मानवी समाज वाचवायचा असेल,संतोष देशमुखांसारख्या सेवाव्रतींचे जीव वाचवायचे असतील तर समस्त मतदार आणि विशेषत: युवाशक्तीने आता संघटीत झालं पाहिजे‌.आमचे हिन्दूच हिंदुत्वाचं ढोंग करणाऱ्या गुन्हेगार राजकारण्यांकडून आणि त्यांनी पोसलेल्या बांडगुळांपासून खतऱ्यामध्ये आहेत.हिंदु तसा खतऱ्यामध्ये नाही.हिन्दूच हिन्दूंना संपवत आहे.येथील कुऱ्हाडींचे पाशवी दांडेच गणागोतासाठी काळ ठरत आहेत.त्यांच्या मतलबाआड येणाऱ्यांना पशुवत वेदना देऊन हलाल करण्याची कसाई कामे करणाऱ्या टोळ्या राजकारणातून निर्माण झालेल्या आहेत‌. म्हणून असल्या हलकट,निच,अमानुष राजकीय गुन्हेगारांना यापुढे मतदान केलं जाणार नाही...गुन्हेगारीपासून दुर असलेले खरे समाजसेवी आणि विधायक लोकप्रतिनिधीच संसद आणि विधान परिषदेच्या पवित्र सदनात विराजमान करता येतील. यासाठी काय काय करता येईल त्या दक्षता घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत.त्यापूर्वी एक विराट लोक आंदोलन तर आता ईव्हीएम विरूध्द पेटलं पाहिजे.ज्या खोट्या मशिनांपासून लोकांच्या मतांच्या चोऱ्या करून निवडून येतात.दिमाखाने हार तुरे घेऊन बेईमानीनीने निवडून येतात‌ आणि नाचतात.यातीलच अनेक बेईमान आमदार आणि मंत्री म्हणून मिरवतात.परंतू हेच कृतघ्न त्यांच्या पोराबाळांना पशुवत यातना देऊन संपवतात.असे गडगंज संपत्ती मिळवून आपल्या पिढ्या संरक्षित करणारे .त्या राशींनी वाममार्गांची ऐश्वर्ये प्राप्त करणाऱ्या या पाप्यांना आता राजकारणाचे दरवाजे बंद केले पाहिजेत.यांनीच आमचे असंख्य तरूण कामकाजाला वापरले, संपवले आणि कीड्या कुटकुला समान फेकून पण दिलेल.ही परावलंबी,बेईमान जमात  या देशातून या आदर्श‌ महाराष्ट्रातून आता हद्दपारच केली जाईल हा संकल्प युवाशक्तीने करावा.या देशातील तरूण जे मनात आणतील ते परिवर्तन कृतित उतरल्याशिवाय राहणार नाही.एवढी प्रचंड ताकद या माय मराठीच्या मातीत आहे.म्हणून या भुमिला कलंकीत करणाऱ्या व्यभिचारी,स्वैराचारी आकांना आता हाकला..! माणसांना वाचवा,समाजाचे आधार व्हा!

  आज महागाईला अंत नाही.पुढाऱ्यांची घरं चालवण्यासाठी,राजकारणात गुंड पोसण्यासाठी विविध  करांच्या माध्यमातून  होणारी लुट थांबत नाही.चांगभलं होते फक्त पुढाऱ्यांचं,त्यांच्या पोराबाळांचं आणि पोसलेल्या खूनी गुंडांचं.बेरोजगारांना कामाला लावलं जाते ते पुढाऱ्यांचं राजकारण चालवण्यासाठी.त्यांना दारू आणि अंमली पदार्थांची नशा दिली जाते पापी पुढाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी.अर्धिअधिक तरूणाई दारूच्या नशेत नेत्यांना सांभाळते.आपल्या भाडोत्री निष्ठेचा पूर्ण मोबदला या पाप्यांच्या चरणी अर्पण करते.या सर्व तमाशांना विरोध करण्याची हिम्मत दाखवणारा सध्या एखादाच संतोष देशमुख निपजतो.मग त्याचे काय होते हा कौर्याची परिसिमा गाठणारा निर्घूण चित्रपट आज सारा महाराष्ठ्र पाहतो आहे...! "धन्य झाला धन्या मात्र जीवाने गण्या" असे किती उन्मत्त राजकीय चोर हा महाराष्ट्र सहन करणार आहे?आमचीच कुळं संपविणारांना आणखी किती काळ छाताडावर घेऊन नाचणार आहे‌? संपवा आता यांच्या लबाड,खलनायकी,क्रूर भुमिका नाहीतर असे असंख्य संतोष देशमुख नाहक संपविण्यासाठी हे सिध्द आहेत.  स्मशानातील कवट्यांची माळ गळ्यात अडकवून आलेली ही भूतं आहेत.ती कधी घराघरात शिरणार याचा अंदाजही लागू नये एवढी परिस्थिती बिघडण्या अगोदर येथील हिंदुच हिंदूंचे दुष्मन कसे आहेत याचा विचार केला पाहिजे ."हिंदु खतरे मे है" ह्या लबाड घोषणा ऐकण्याऐवजी ईव्हीएम हमे कैसे लूट रहा है हे लक्षात घ्यावं.आमची लोकशाही संपविली जात आहे.अपात्र गुन्हेगार राजकारणी सभागृहात विराजमान होऊन मतदारांचेच सर्वस्व लूटून त्यांना भिकारी करण्याचे षडयंत्र सक्रीय करत आहे. म्हणून उठा...जागे व्हा आणि हिन्दू व मराठ्यांनाच संपविणाऱ्या हिंन्दूत्वाचे बुरखे पांघरलेल्या माफियांवर प्रथम  वार करा...!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here