श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न..!

0
4

श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न..!

सभासदांना ७.५ टक्के लाभांश जाहीर; ठेवी व कर्ज व्यवहारात समाधानकारक वाढ

बारामती : श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वीरशैव मंगल कार्यालय, भिगवण रोड, बारामती येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन महेश वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासदांना ७.५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.


सभेच्या प्रारंभी वार्षिक विषयांचे वाचन संस्थेचे सचिव राजेंद्र मोरे यांनी केले. तर संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन तज्ञ संचालक किरण चौधरी यांनी केले.
श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेने यशस्वीपणे ३१ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या कालावधीत संस्थेच्या ठेवी तसेच कर्ज व्यवहारात झालेल्या समाधानकारक वाढीबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.


दरम्यान, काही सभासदांनी संस्थेच्या कामकाजासंदर्भात विविध सूचना मांडल्या. सभासदांच्या सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा व बदल कामकाजात करण्यात येतील, असे उपाध्यक्ष नवनाथ आपुणे यांनी सांगितले.
सभेनंतर उपस्थित सभासद व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी संस्थेचे संचालक दिलीप गारुळे, सचिन माने, सुधाकर माने, सदाशिव काशीद, प्रा. सुरेश साळुंखे, गजानन आगवणे, आकाश काळे, राजू धोत्रे, भामा शिंदे, अलका आपुणे, प्रमोद बुलबुले, बाबुराव कचरे तसेच संस्थापक अनिल दळवी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या ३१ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना सभासदांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleशेतीमधील शेतमालाचे प्रभावी विपणन ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज-श्री राजेंद्र पवार
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here