श्री. युगेंद्र शर्मिला श्रीनिवास पवार यांना साप्ताहिक ‘भावनगरी’ परिवाराच्यावतीने सप्रेम अभिष्टचिंतन….!

0
47

श्री. युगेंद्र शर्मिला श्रीनिवास पवार यांना साप्ताहिक ‘भावनगरी’ परिवाराच्यावतीने सप्रेम अभिष्टचिंतन….!

आजचा दिवस बारामतीच्या राजकीय आकाशात झळकणाऱ्या एका ताऱ्याचा, नव्या पिढीच्या नव्या दमदार नेतृत्वाचा!
अत्यंत अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाची ठसा उमटवणारे, तरुणाईच्या हृदयात स्थान निर्माण करणारे,
कलागुण, आत्मविश्वास, राजकीय जाण आणि संयम यांचं सुंदर मिश्रण म्हणजे युगेंद्र श्रीनिवास पवार….

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, साप्ताहिक ‘भावनगरी’च्या वतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छां….!

युगेंद्र दादा,
आपण ज्या पद्धतीने बारामतीच्या राजकीय पटलावर आत्मविश्वासाने एन्ट्री केलीत,
ते पाहून असं वाटतं की राजकारण ही आपली उपजत देणगी आहे!

आपल्याला आदरणीय आजोबा श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांची दूरदृष्टी आणि मार्गदर्शन, आत्या सुप्रियाताई सुळे आणि
आई-वडिलांचा आशीर्वाद, आणि कार्यकर्त्यांची अपार श्रद्धा… या तिन्ही गोष्टींचा
मिलाफ आपल्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसतो.

आज आपण ज्या निष्ठेने बारामती तालुक्यातीलवाडी वस्तीवर गोरगरीब जनतेच्या अश्रू पुसतात. राजकीय पटलावर झगडत आहात,
त्यातून भविष्यात आपल्याला महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं शिखर गाठण्याची योग्यता नक्कीच मिळो. कार्यकर्त्यांना आपल्याकडून नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त होत आहेत.
शिवाय चिराग गार्डन, भिगवण रोड – एक उत्साह, एक आपुलकीचा आपल्या अभिष्टचिंतनाचा महोत्सव! याच्याचे एक छोटंसं उदाहरण होय…!

आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा हा केवळ कार्यक्रम नव्हता,
तो होता हजारो हृदयांचा आवाज – युगेंद्र दादांवरच्या प्रेमाचा, विश्वासाचा, आणि आदराची, गर्दी मंचावर कार्यकर्ते नागरिक हितचिंतकाची लाट, प्रेमाचा वर्षाव, करत होते. तर
कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर, पोस्टर्स, हार-पुष्पागुच्छ… सगळंच काही ‘जोरदार रित्या होते.’!

सर्व युवा कार्यकर्ते ,
विविध मंडळ, विविध सामाजिक माझी आजी संस्थांचे पदाधिकारी
बारामती कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी अभिष्टचिंतनासाठी उपस्थिती नोंदवली!

दादा, आपला प्रवास केवळ सुरुवात आहे!
आपण आपल्या काकांच्या विरोधात उभं राहताना जे धाडस दाखवलंत,
तेच दर्शवतं की आपल्यात काही तरी वेगळं आहे – एक झंझावात!
आपली नव्या राजकारणाची दिशा ठरवणारी भूमिका ही बारामतीकरांसाठी
एक नवा विश्वास, नवी आशा ठरत आहे.

oplus_0

युगेंद्र दादा, आपल्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा!
आपला प्रवास यशस्वी, आरोग्यदायी, समृद्ध, आणि लोकहिताचा असो,
हीच ‘भावनगरी’ परिवाराकडून मन:पूर्वक सदिच्छा!

आपला हितचिंतक,
संतोष शिंदे
संपादक – साप्ताहिक ‘भावनगरी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here