‘श्री निळकंठेश्वर पॅनल’च्या प्रचाराला अजितदादांच्या उपस्थितीत शुभारंभ व सभा माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025: प्रचाराचा उत्साह, अर्जांचा पूर…!

0
31

‘श्री निळकंठेश्वर पॅनल’च्या प्रचाराला अजितदादांच्या उपस्थितीत जल्लोष
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025: प्रचाराचा उत्साह, अर्जांचा पूर

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठित दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर माळेगाव बु. या संस्थेच्या 2025-30 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘श्री निळकंठेश्वर पॅनल’चा प्रचार शनिवार, १४ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता ओम साई मंगल कार्यालय, पाहुणेवाडी येथे होणार आहे. या प्रचारसभेला मा. ना. अजितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी, सभासद आणि कारखान्याच्या भवितव्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली असून, सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

९० अर्जांची नोंदणी, गटबाजी ठळक

१२ जून रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कारखान्याच्या प्रांगणात कार्यकर्त्यांची गर्दी उसळली. एकूण ९० अर्ज ११ वेगवेगळ्या गटांतून दाखल झाले असून, निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

गटनिहाय अर्जांची संख्या:

पणदरे : १५

सांगवी : १४

माळेगाव : १२

खांडज-शिरवली : ९

महिला राखीव : ९

बारामती : ७

निरावागज : ७

भटक्या जमाती : ६

अनुसूचित जाती-जमाती : ५

इतर मागास प्रवर्ग : ४

व वर्ग सहकारी संस्था / बिगर उत्पादक / पणन : २
राजकीय पार्श्वभूमी आणि नेतृत्व या निवडणुकीला राजकीय रंगही चढला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पारंपरिक प्रभाव, तर दुसरीकडे अजित पवार यांचे तरुण नेतृत्व व कार्यक्षम संघटन — ही निवडणूक स्थानिक राजकारणाचा दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे.


याशिवाय गुरु चंद्रराव तावरे व शिष्य रंजनकाका तावरे यांच्यातील नेतृत्वप्रश्न या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
श्री. केशवराव (बापू) जगताप हे श्री निळकंठेश्वर पॅनलचे प्रचारप्रमुख असून, या पॅनलने कारखान्याच्या विकासासाठी पारदर्शक व निर्णयक्षम नेतृत्व देण्याचे आश्वासन दिले आहे
ही निवडणूक उस उत्पादक व सभासदांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. १४ जून रोजी अजितदादांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रचार सभेमुळे निवडणुकीला अधिक वेग येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here